RPI पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा विस्फोट; ऐन निवडणुकीत रामदास आठवलेंची साथ सोडणार का?

RPI पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा विस्फोट पाहायला मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपात कोणतीही जागा मिळाली नसल्याने ठाणे जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv
Published On
Summary

महायुतीच्या जागावाटपावर आरपीआयची तीव्र नाराजी

जागांची मागणी करूनही एकही जागा मिळाली नसल्याने कार्यकर्ते नाराज

कार्यकर्ते रामदास आठवलेंची साथ सोडणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून तीन जागांची मागणी केली होती. परंतु एकही जागा देण्यात आली नसल्याने पक्षातील असंतोष उघडपणे समोर आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते साथ सोडणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Ramdas Athawale
उपराष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला, खिडकींच्या काचा फुटल्या; संपूर्ण अमेरिकेत खळबळ

आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी जागावाटपाबाबत बोलताना सांगितले की, आम्हाला जाणीवपूर्वक डांबून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेससोबत असताना आम्हाला संधी मिळत होती. मात्र आता महायुतीमध्ये असूनही आमची ही अवस्था करण्यात आली आहे'.

महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त करत असतानाच, आरपीआय महायुतीला मतदान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सत्तेत आल्यानंतर किमान स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि शिक्षण मंडळामध्ये तरी पक्षाला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमचा पक्ष तळागाळातील समाजासाठी काम करत आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी करून घेणे ही महायुतीची जबाबदारी आहे,असेही जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सांगितले.

Ramdas Athawale
मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

नाराजीमुळे महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून, याचा आगामी निवडणूक रणधुमाळीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाराजीमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रामदास आठवलेंची साथ सोडणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Ramdas Athawale
Beed Crime : बीडमध्ये दिवसाढवळ्या एकाची हत्या; आधी गोळ्या झाडल्या, नंतर धारदार शस्त्राने वार

मुंबईत आठवलेंच्या पक्षाचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

तत्पूर्वी, मुंबईत शिंदे गट आणि भाजपने आरपीआयला प्रत्येकी ६-६ जागा सोडल्या होत्या. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही. एकीकडे मुंबईत रामदास आठवलेंच्या पक्षाने ३९ उमेदवार उभे केले होते. त्यातील २६ जणांनी माघार घेतली. तर १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com