Beed Crime : बीडमध्ये दिवसाढवळ्या एकाची हत्या; आधी गोळ्या झाडल्या, नंतर धारदार शस्त्राने वार

Beed Crime news : बीडमध्ये दिवसाढवळ्या एकाची हत्या झालीये. या हत्येचे घटनेने बीडच्या अंकुशनगर भागात खळबळ उडाली आहे.
Beed News
beed crime Saam tv
Published On
Summary

बीडमध्ये एकाची हत्या झाली

दिवसाढवळ्या एकाची हत्या झाल्याने परिसरात उडाली खळबळ

बीडकरांकडून कडक कारवाईची मागणी

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबेना झाल्या आहेत. अकोल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असताना बीडमध्ये एकाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अंकुश नगर भागात आज मंगळवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक नाल्याचे काम करणाऱ्या कामगारावर बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आले. मात्र त्या गोळ्या कामागाराला लागल्या नसल्याची माहिती आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपीने पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केले.

Beed News
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कॅसेट जुनी झाली; एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका, VIDEO

हर्षद उर्फ दादा शिंदे असे हत्या झालेल्या का कामगाराचे नाव आहे. तर विशाल सूर्यवंशी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

हत्या झालेल्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आता पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेने बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीडकरांकडून या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Beed News
राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्यांनी धरली शिंदेसेनेची वाट

अकोल्यात राजकीय वादातून काँग्रेस नेत्यावर हल्ला

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा हल्ला झालाय. हल्ला करणार्या तरुणाचं नाव उबेद पटेल असं आहे. उबेद पटेल हा 24 मे 2019 मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com