matheran ghat accident news social media
मुंबई/पुणे

Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

Tourist Car Accident in Matheran : माथेरान घाटात पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. तर त्यातील एक महिला सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

  • माथेरान घाटात भीषण अपघात

  • मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

  • पर्यटक जखमी, महिला सुखरूप

विकास मिरगणे, साम टीव्ही

माथेरान घाटात आज, सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ल्याहून आलेल्या पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळून ती खाली रस्त्यावर आदळली. यात चार जण जखमी झाले असून, एक महिला सुखरूप असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात घाटात अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील कुर्ला-चेंबूर परिसरातील पाच पर्यटकांचा एक गट माथेरानला निघाला होता. कारमधून जात असताना वळणावर चढणीला चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला. कार दरीच्या बाजूला कोसळली आणि घाटात खालील बाजूस असलेल्या रस्त्यावर आदळली. या अपघातात पर्यटक जखमी झाले आहेत.

वळणावर समोरून वाहन आलं अन्...

कुर्ला येथील पर्यटक वाहनानं नेरळ येथून माथेरानला जात होते. कारने घाटातून जात असताना अवघड वळण असलेल्या पिटकर पॉइंट येथील येस टन येथे अचानक समोरून वाहन आलं. ते बघून चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. रस्त्यालगत रेलिंग नसल्यानं कार थेट दरीच्या बाजूला कोसळली. तेथून ती घाटाच्या खालील बाजूस असलेल्या रस्त्यावर आदळली.

माथेरान घाटात हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला. दरीच्या बाजूने कार थेट रस्त्यावर आपटल्यानं दर्शनी भागाचं नुकसान झालंय. सुदैवानं या कारमधील सर्व पर्यटक बचावले आहेत. या अपघातात श्रीधर साळुंखे, सोहेल शेख, अहमद खान आणि आकाश गायकवाड जखमी झाले आहेत. एका पर्यटकाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. शिवाय अन्य एका पर्यटकाच्या डोक्याला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

स्थानिक वाहनचालकांची तत्परता

अपघातग्रस्तांच्या मदतीला स्थानिक वाहनचालक धावून गेले. तत्परता दाखवून त्यांनी अपघातग्रस्त कारमधून सर्व जखमींना बाहेर काढले. नेरळ येथील शेवाळे रुग्णालयात तात्काळ दाखल केले. या वळणावर यापूर्वीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले रेलिंग तुटलेले आहेत. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं रेलिंग बसवलेल्या नाहीत. येथील वाहनचालक आणि येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळकोकणात लाडक्या बाप्पाचं आगमन भक्ताचा उत्साह शिगेला

Manoj Jarange Patil: इंग्रजांच्या काळात आंदोलनाला परवानगी, पण फडणवीसांच्या काळात नाही; मनोज जरांगे कडाडले|VIDEO

Kunickaa Sadanand: 'सलमानला सपोर्ट केल्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या...', बिग बॉस १९मधील कुनिकाचा धक्कादायक खुलासा

बलात्काराची धमकी, २३ लाखांची खंडणी; हनी ट्रॅपमध्ये क्लब मालक अडकला, शेवटी संपवलं आयुष्य

Parle G In America: अमेरिकेत किती रुपयांना मिळतो Parle-G, किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT