kalyan Muncipal Corporation Election 2025 - 26  Saam tv
मुंबई/पुणे

KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

Kalyan Municipal Corporation election Mahayuti formula : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना–भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला. कल्याण पूर्वेत भाजपाला कमी जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही मराठी, प्रतिनिधी कल्याण

Shiv Sena BJP seat sharing Kalyan Dombivli elections : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला. त्यानंतर कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ६७ तर भाजपला ५४ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपाला अवघ्या ७ जागा मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका न्याय न मिळाल्यास भाजप कल्याण पूर्वेत स्वबळावर निवडणूक लढवेल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

महायुतीतील जागा वाटप करताना वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला. मित्र पक्षांमुळे भाजप कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याची भावना व्यक्त करत, कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष नंदु परब तसेच निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी नाना सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत, त्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे त्यांनी मान्य करत, याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतरही कार्यकर्त्यांची नाराजी कमी होताना दिसली नाही.एकीकडे महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला, तरी दुसरीकडे या जागावाटपामुळे शिवसेना–भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे चित्र आहे. आता या नाराजीवर महायुतीचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात आणि कल्याण पूर्वेतील परिस्थिती कशी हाताळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO

Cancer Symptoms: शरीरात हे ५ बदल दिसले तर समजा कॅन्सरची गाठ होतेय तयार; दुर्लक्ष करणं पडेल महागात

TMMTMTTM Cast Fees : कार्तिक आर्यनने घेतले अनन्यापेक्षा 10 पट जास्त पैसे, 'तू मेरी मैं तेरा...'मध्ये कुणाला किती फी?

SCROLL FOR NEXT