Ajit Pawar News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politcs : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणती खाती मिळणार? खातेवाटपाची संभाव्य यादी आली समोर, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाट्याला कोणती खाती मिळणार, याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना पुन्हा अर्थ खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निडवणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं. या विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी महायुतीच्या ३९ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. यावेळी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणती खाते येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य यादी समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडे अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन ही खाती वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे.

कसे असेल खातेवाटप?

सहकार- मकरंद पाटील,

अर्थ व नियोजन- अजित पवार,

महिला व बालकल्याण- आदिती तटकरे,

कृषी- दत्तामामा भरणे,

वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ,

अन्न व नागरी पुरवठा- धनंजय मुंडे

राज्य उत्पादन शुल्क हा विभाग अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नॉट रिचेबल अजितदादा नेटवर्कमध्ये

मंत्र्यांच्या शपथविधीनंतर सलग दोन दिवसा उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल होते. मागील दोन दिवसांत अजित पवारांनी भेटीगाठी टाळल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवारांनी दोन दिवस विश्रांती घेतली. त्यानंतर आज पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यानंतर आज नागपुरात अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकत्यांनी गर्दी केली.

दोन दिवसांनी पुन्हा भेटीगाठी वाढवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. घशाच्या संसर्गामुळए अजित पवारांनी दोन दिवस विश्रांती घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितली. अर्थ खाते न मिळाल्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या नाराजीमुळे अजित पवार खातेवाटप लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT