Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; महाविकास आघाडीने घेतला 'हा' निर्णय

महाविकास आघाडी सरकारने एकनाथ शिंदे यांच्याकडील सर्व खाते काढून घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांसह बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संतापले आहेत. शिंदे गटातील तब्बल 16 बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून (ShivSena) नोटीस पाठवण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने एकनाथ शिंदे यांच्याकडील सर्व खाते काढून घेतली आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहेत. (Eknath Shinde Latest News)

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Eknath Shinde Latest News)

या मंत्र्यांकडील खाते बदल

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. तर गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे सोपवण्यात आलंय. दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देम्यात आलं आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. (Shivsena Latest News)

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग) ,सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

SCROLL FOR NEXT