Sanjay Raut : 'माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही, या मला अटक करा'

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावलं आहे.
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई : राज्यात शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. माहितीनुसार पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं असून त्यांना 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. दरम्यान, ईडीने समन्स बजावताच खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. "माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut : आताची सर्वात मोठी बातमी! संजय राऊत यांना पुन्हा ED चे समन्स

एकीकडे शिंदे गटाने बंड केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या बड्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांची सुद्धा सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं असल्याने काय ती नोटीस काय ते टायमिंग अशीच चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे.

दरम्यान, ईडीने समन्स बजावताच संजय राऊत यांनी एक ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com