Maharashtra MLC Election results 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार? सुषमा अंधारेंनी थेट नावचं सांगितलं

Maharashtra MLC Election results 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवारांचं नाव त्यांनी सांगितलं आहे.

Satish Daud

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजेपासून सुरुवात झाली आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवारांचं नाव त्यांनी सांगितलं आहे.

"'गर्जे'ल तो पडेल काय? #खेला_होबे" अशी पोस्ट सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून केली आहे. अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि उमेदवारी देण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये 'गर्जे'ल असा शब्द वापरला असल्याने त्यांचा रोख शिवाजीराव गर्जे यांच्याकडेच दिसत आहे.

त्यामुळे निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार अजित पवार यांच्या गटाचा असणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत कोणत्याही उमेदवाला विजय मिळवण्यासाठी २३ मतांची गरज आहे. सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे ४० आमदारांची मते असून त्यांच्याकडे ६ मतांची तूट आहे.

एकीकडे अजित पवार गट महाविकास आघाडीतील काँग्रेसची मतं फोडल्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवाजीराव गर्जे हे निवडणुकीत पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष बाब म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवलं आहे. नार्वेकरांची भिस्त काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर आहेत.

त्यामुळे अजित पवार गटाने जर काँग्रेसची मतं राष्ट्रवादीकडे वळली, तर त्याचा फटका शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला बसू शकतो. मात्र, महाविकास आघाडीतील मतांची फाटाफूट होणार नाही, असा विश्वास त्यांचे नेते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत खरा गेम कुणाचा होणार, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: लग्नात परीसारखा सुंदर लूक हवाय? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

Ajit Pawar Beed Tour: अजित पवारांच्या दौऱ्यातील हृदयस्पर्शी दृश्य; चिमुकला कडेवर आणि महिला पोलीस बंदोबस्तावर

Maharashtra Live News Update: PM नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात खास ड्रोन शो

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT