Maharashtra SSC Result 2025 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या निकालाबाबत (Maharashtra Board SSC Result 2025 ) माहिती दिली. राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील 94.10 टक्के मुले पास झाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पास होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्केने कमी लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे.
विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल पाहू शकतात: Maharashtra SSC Result 2025 Declared – How to Check 10th Results Online
mahresult.nic.in
mahahsscboard.in
ssc.mahresults.org.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.net
वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा.
"SSC Result 2025" लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव (हॉल तिकीटवर नमूद केल्यानुसार) टाका.
"View Result" बटणावर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.
यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर होताच सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा. कोकण विभागाने गेल्या वर्षी सर्वाधिक निकालाची टक्केवारी (९८.११%) नोंदवली होती, यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.