red alert for mumbai thane raigad palghar imd predicts heavy rain  Saam Tv News
मुंबई/पुणे

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह रायगड, पालघरला रेड अलर्ट! पुढील ३ तास पाऊस घालणार धुमाकूळ

Maharashtra Rain Update : विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपुरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत संपूर्ण कोकणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, घाट परिसरातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपुरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात परिसरात पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: खंडाळा-लोणावळाही पडेल फिकं, कोल्हापूरमधील 'या' हिल स्टेशनला भेट द्याच

Maharashtra Live News Update : पुण्यात साकारला गेला संगमनेरच्या "अन्सार चाचा" च्या वडापावचा देखावा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर समर्थक फोडला

Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? अजित पवारांचे महत्वाचे विधान चर्चेत

Women Health: महिलांची मासिक पाळी थांबण्याचे वय कोणते?

SCROLL FOR NEXT