वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई
राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका संध्या जोशी या एकनाथ शिंदें गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू
मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक १८ च्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविकास संध्या विपुल जोशी यांनी उद्धव ठाकरे (Maharashtra Politics) यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचं समोर आलंय. संध्या जोशी आज २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश असल्याची माहिती समोर आली आहे. संध्या जोशी या तीन तीन वेळेस नगरसेविका आहेत.
ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का
पहिल्या दोन टर्ममध्ये संध्या जोशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. २०१६ साली संध्या जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर संध्या जोशी नगरसेविका (Uddhav Thackeray group) म्हणून निवडून आल्या होत्या. मागाठणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे.
संध्या जोशी शिंदे गटात प्रवेश करणार
यापूर्वीच या भागातील रिद्धी खुरसुंगे आणि गीता काशीद या दोन नगरसेविकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला (Eknath Shinde group) होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचं गाळप सुरू असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरशीची लढत (Mumbai Vidhan Sabha election) झाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.