Uddhav thackeray Video : आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? बदलापूर अत्याचार प्रकरणावरावरून उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav thackeray on badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणावरावरून उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल करत ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
Uddhav Thackeray news
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

मुंबई : बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अत्याचाराच्या घटनेनंतर सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरत रेल्वे रोका केला. त्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी शाळेचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या आरोपीलाही निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बदलापुरातील अत्याचार प्रकरण आणि आंदोलनावर भाष्य केलं. 'देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या आहेत. त्याचा वापर राजकारणासाठी वापर केला जात आहे. या प्रकरणाचा असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यायला हवं, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray news
Badlpaur Protest: बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, धक्कादायक VIDEO

'आपण काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही. संपूर्ण देशातील मुलींच रक्षण केले पाहिजे. आरोपीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray news
Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, VIDEO

'दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडलं होतं. या आरोपीला फासावर लटकवायला वेळ लागला. अशा प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेस विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. हाथरस, उन्नव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपींना फाशी झाली पाहिजे. आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. विधानसभेचे अधिवेशन कोरोना विषाणूमुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. पण आमचे सरकार पाडण्यात आले. त्यामुळे हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता स्कॉट मुक्त असून त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या आरोपीला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com