Sanjay raut, Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेवरून राजकारणातील भावाभावांमध्ये जुंपली, कोण कोणास काय म्हणालं? VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजनेवरून विरोधकांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी लाडका भाऊ योजनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

Priya More

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर शिवसेना पक्षामध्ये दोन गट पडले. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट. या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर नेहमी टीका करताना दिसतात. तर कधी अधिवेशनामध्ये एकमेकांशी गप्पा मारताना, कधी चॉकलेट देताना दिसतात. आता लाडक्या भाऊ योजनेवरून राजकारणातील या भावाभावांमध्ये जुंपली असल्याचे चित्र दिसून येत आहे. लाडक्या भाऊ योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

'लाडकी बहीण' योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने 'लाडका भाऊ' योजनेची घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. आधीच लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अशामध्ये आता लाडका भाऊ योजनेवरून देखील विरोधकांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी लाडका भाऊ योजनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी भाऊ योजना म्हणजे तरुणांची फसवणूक असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी लाडका भाऊ योजनेवर टीका करताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे. ही योजना महाराष्ट्र सरकार मध्ये १९७४ पासून सुरू आहे. या योजनेत आधीपासून मानधन दिले जाते. त्यामुळे या योजनेत नवीन काही नाही. थोडक्यात जनतेची आणि तरुणांची ही फसवणूक आहे. ही सर्व जुनी योजना आहे आणि ही जुनी योजना मुख्यमंत्र्यांच्या नव्या नावाने समोर आणली.' तसंच, 'महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करेल की या योजनेला फसू नका. आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळं आठवत आहे. लाडका भाऊ लाडकी बहीण प्रत्यक्षात या योजना जुन्या आहेत. आताच्या घडीला इंडस्ट्रीत रोजगार उपलब्ध करा. सरकार खाजगीकरण नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करत आहे. एकीकडे तरुणांना अशाप्रकारे भूल थापा देत आहे.', असं देखील मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी लाडका भाऊ योजनेवर मत व्यक्त करताना सांगितले की, 'लाडका भाऊ योजनेवर विरोधकांनी टीका केली नाही. विरोधकांनी सरकारी पैशातून एकंदरीत जे राजकारण सुरू आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये आणि लाडक्या भावांना ६०००, पदवीधरांना १००००. खरी गरज लाडक्या बहिणींना आहे अशी आमची भूमिका आहे. कारण ती घर चालवते, घरात नवरा, भाऊ बेरोजगार, नोकऱ्या नाहीत.'

तसंच, 'आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर २००० लोडरच्या जागा भरण्यासाठी २५००० सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत. यांनाही १० हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा १० हजार रुपये टाका. १५०० रुपयांनी काय होतं. मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का पंधराशे रुपयात? मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण किंवा सून त्यांचं घर पंधराशे रुपयात चालू शकते का? लाडक्या बहिणीवर अन्याय कशा करिता करता ही आमची भूमिका आहे. लाडक्या बहिणीलाही १० हजार रुपये द्या. लाडक्या भावाला ही १० हजार रुपये द्या आणि स्त्री-पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या हीच आमची भूमिका आहे.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT