नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून आजपर्यंत किमान ४० जवानांच्या हत्या झाल्या असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत यांनी पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या दिवशी मोठा हल्ला झाला. अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात चोळत बसले आहेत. देशाच्या निवडणुका इतर उद्योग धंद्यांमध्ये ते व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. ज्यांनी आपल्या देशाच्या जवानाची हत्या करणाऱ्यांना दुश्मन समजले पाहिजे.
संजय राऊत यांनी पीएम मोदींसोबत अमित शहरांवर देखील टीका केली आहे. 'नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पुन्हा आजपर्यंत किमान ४० जवानांच्या हत्या झाल्या आहेत. मी हत्या बोलतो याला. याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. थोडीतरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यायला हवा. अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत. टोटल फेल्युयार गृहमंत्री आहेत. तीच विटी आणि दांडू तेच गृहमंत्री ते आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काही ठोस कार्य झालं नाही. तेच अमित शहा तेच मोदी तेच रक्षामंत्री. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात जोडत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत.', असे वक्तव्य त्यांनी केले.
'अमित शहा देशातल्या निवडणुका इतर उद्योग, खोके जमावन, धमक्या देणं याच्यामध्ये व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजले पाहिजे. अमित शहा यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी लावली. ती ताकद जम्मू कश्मीरमध्ये, मनिपूरमध्ये देशातल्या शत्रूंना संपवण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती.', असे देखील वक्तव्य त्यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.