Oman Oil Tanker: समुद्रात बुडाले तेलवाहू जहाज, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता

13 Indians, 3 Sri Lankans missing after oil tanker capsizes off Oman: ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले आहे. या जहाजावर १६ जण होते. त्यापैकी १३ भारतीय नागरिक आणि ३ श्रीलंकेचे नागरिक होते. बेपत्ता झालेल्या सर्वांचा शोध सुरू आहे.
Oman Oil Tanker: समुद्रात बुडाले तेल टँकर जहाज, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता
Oman Oil Tanker CapsizedSaam Tv
Published On

ओमानच्या किनारपट्टीवर तेलवाहू जहाज बुडाल्याची (Oman Oil Tanker Capsized) घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ११७ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्यावर बुडाले. या जहाजावर असलेले १६ जण बुडाले आहेत. यामध्ये १३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्वजणांचा शोध घेतला जात आहे.

Oman Oil Tanker: समुद्रात बुडाले तेल टँकर जहाज, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता
Mumbai Local Train Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी गायलं शाहरुख खानचं हिट गाणं; सोनू निगमनेही केलं तोंडभरून कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू टँकर बुडाला आहे. या जहाजावर १६ जण होते. त्यापैकी १३ भारतीय नागरिक आणि ३ श्रीलंकेचे नागरिक होते. जहाज बुडाल्यानंतर हे सर्व जण बेपत्ता झाले. या सर्व बेपत्ता सदस्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्याप यापैकी कोणाचाही शोध लागलेला नाही. या तेलवाहू जहाजाचे नाव प्रेस्टिज फाल्कन असे होते.

या तेलवाहू जहाजावर पूर्व आफ्रिकन देश कोमोरोसचा ध्वज होता. मंगळवारी हा तेलवाहू जहाज ओमानच्या इंडस्ट्रियल डुक्म नावाच्या मुख्य बंदराजवळ अचानक बुडाले. तेलवाहू जहाज बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या सर्वांचा शोध सुरू आहे.

'कोमोरोस देशाचा - ध्वज असलेले तेलवाहू जहाज ड्यूकम बंदर शहराजवळ रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेला २५ नॉटिकल मैलांवर बुडाले. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.', अशी माहिती मरीटाईम सिक्युरिटी सेंटरने (एमएससी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

ड्यूकम बंदर ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर आहे. हे बंदर सुलतानाच्या प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या अगदी जवळ आहे. यामध्ये एक प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. ड्यूकम हे ओमानचे एकमेव सर्वात मोठं बंदर आहे.

Oman Oil Tanker: समुद्रात बुडाले तेल टँकर जहाज, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता
Non-Veg Ban: भारतातील हे एकमेव शहर आहे, जिथे कोणीही मांसाहार करत नाही, शासनाने घातली आहे बंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com