Pm Modi and Amit Shah Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजप 400 पार गेला असता तर मोदींनी 3 गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या; 'सामना'तून टीका

Satish Daud

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे 241 खासदार निवडून आले. अशातच भाजपने खरंच 400 जागा जिंकल्या असत्या, तर नरेंद्र मोदी यांनी 3 महत्वाच्या गोष्टी घडवून आणल्या असत्या, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे.

रोखठोकमध्ये काय म्हटलंय?

मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती, असा टोला सामनाच्या रोखठोकमधून लगावण्यात आलाय. त्याचबरोबर संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते. ‘तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते, असा आरोपही सामनातून करण्यात आला.

"‘तीन’ हा आकडा संघ विचारधारा मानणाऱ्यांसाठी अशुभ असला तरी या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या व त्यासाठी तहहयात आपणच पंतप्रधान राहू हा ‘पुतीन पॅटर्न’ लागू करण्यासाठी संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्यविषयक कलमे बदलायलाही त्यांनी पावले टाकली असती, पण भारतीय जनतेने हे होऊ दिले नाही", असंही सामनात मांडण्यात आलं.

"शेकडो जवानांचे बलिदान सुरूच"

"घर घर तिरंगा’ हे राजकीय अभियान मोदी सरकारने सुरू केले. त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी आजही शेकडो जवानांचे बलिदान सुरूच आहे व दहा वर्षांच्या मोदी काळात तिरंगा जवानांच्या रक्ताने जास्तच भिजला. जम्मू-कश्मीरात रोज आतंकी हल्ले सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यात दोन लष्करी अधिकारी ‘हुतात्मा’ झाले. हे सर्व वेदनादायी आहे", अशी खंतही सामनातून व्यक्त करण्यात आली.

"स्वातंत्र्य दिनाच्या आधी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून कॅप्टन दीपक सिंह यांनी कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करले. अतिरेक्यांशी समोरासमोर चकमक झाली व कॅप्टन दीपक सिंह यांच्या छातीत गोळी लागली. ते जखमी झाले. त्या अवस्थेतही ते जवानांना सूचना देत राहिले. मोहिमेचे नेतृत्व करीत पुढे निघाले व शेवटी कोसळून पडले. लाल किल्ल्यावरील तिरंगा आज सुरक्षित आहे तो या असंख्य बलिदानांमुळेच", असंही सामनाच्या रोखठोकमध्ये मांडण्यात आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT