राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले असून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खळबळजनक दावा केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा पराभव होणार, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
अंबादास दानवे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी सकाळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दानवे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. त्याचबरोबर काँग्रेसचा देखील खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसने जाहीर करावं, असं अंबादास दानवे म्हणाले.
मुळात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही. त्यांच्या मागे जनमत असून ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सध्या बोलणे ठीक राहणार नाही, असंही दानवे म्हणाले.
राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे मग आक्रोश कोणाकडे करायचा? महायुती सरकार दंगली सरकार पुरस्कृत आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली. सरकारला त्यांच्या कामावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे दंगली घडवून मतांची विभागणी करायची आहे.
अजित दादा असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या पक्षाचा पराभव विधानसभेत अटळ आहे. अजित पवार हे बारामतीतून लढणार नाही अशा चर्चा फक्त निवडणुकीतून लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात आहेत. मुळात इतर मतदारसंघातील लोक यांना स्वीकारणार नाहीत हे त्यांना कळून चुकलं आहे, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावे, आणि त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळू दे असे विठ्ठल चरणी आपण साकडे घातल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पंढरपुरात दिली.
अंबादास दानवे आज पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी उद्धव ठाकरे यांना मिळू दे असे साकडे विठ्ठल चरणी घातल्याचे सांगितले .
ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे तत्व लागू होत नाही. एकनाथ शिंदे यांचे केवळ 40 आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. नेतृत्व करण्याची ज्याच्यामध्ये धमक किंवा शक्ती आहे त्यांना संधी मिळावी ती उध्दव ठाकरे यांच्याकडे असल्याचे दानवे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.