sharad pawar ajit pawar x
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Political News : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे विकास पासलकर यांनी आज (१० ऑक्टोबर) पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Yash Shirke

  • शरद पवारांना मोठा धक्का

  • विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. विकास पासलकर आणि इतर कार्यकर्त्यांना अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. विकास पासलकर हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी होते.

संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांची शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख निर्माण झाली होती. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याने शरद पवार गटाला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार गटात प्रवेश करत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.

विकास पासलकर हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून समाज कार्य करत होते. पक्षप्रवेशाबाबत विचारले असताना त्यांनी 'समाजिक कार्य करताना कार्यकर्त्यांच्या भावना समजून राजकारणात प्रवेश करत आहे', असे म्हटले होते. शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

'बऱ्याच कालावधीपासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यांनाच विचारुन मी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबद्दल मला कुठलीही नाराजी नाही. आता पुढे जाताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे. म्हणून हा निर्णय घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू, फुले, आंबेडकर यांना मानणारा पक्ष आहे. त्यांच्यासोबत काम करताना आनंद होईल' असे विकास पासलकर यांनी म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT