Maharashtra Politics x
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पुण्यात शरद पवारांना दुहेरी धक्का, दोन दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Maharashtra Political News : पुण्याच्या शिरूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दोन दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Yash Shirke
  • पुण्यात शरद पवारांचा दुहेरी धक्का

  • दोन दिग्गज नेत्यांनी साथ सोडली

  • दोघांनीही भाजपमध्ये केला प्रवेश

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात निवडणूका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय पक्षांमध्ये नेते, पदाधिकाऱ्यांची इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पुण्याच्या शिरूरमधील दोन दिग्गज नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आज (१४ ऑक्टोबर) त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रवेशामुळे पुण्यात भाजपची शक्ती आणखी वाढल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांच्यासह रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषदद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप मुख्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या पक्षप्रवेशाच्या वेळी इतर पक्षातील नेत्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले. कार्यक्रमामध्ये शेखर पाचुंदकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शेखर पाचुंदकर आणि स्वाती पाचुंदकर यांच्या प्रवेशाने भाजपची पुणे जिल्ह्यात शक्ती वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT