पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपने १२५ नगरसेवक निवडण्याची तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसचे ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणनीती बैठक पार पडणार आहे.
Maharashtra : पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर १२५ नगरसेवक निवडणून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये मनपा निवडणुकीच्या रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीदरम्यानच काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रामधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भेटीदरम्यान निवडणुकांसंबंधित चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेदरम्यान भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळावर १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी पक्षाने प्रभागनिहाय सर्वे आणि रणनीती आखण्याचे काम सुरु आहे. मागच्या २०१७ च्या मनपा निवडणुकीत भाजपने ९७ नगरसेवक निवडून आणत बहुमत मिळवले होते.
आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजपने १६५ पैकी १२५ नगरसेवक जिंकवून आणण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यासाठी इतर पक्षांमधून भाजपमध्ये अनुभवी उमेदवारांची इनकमिंग होणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान काँग्रेसमधील पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार, पुणे शहर हे ४१ प्रभागांमध्ये विभागले गेले आहे. यापैकी ४० प्रभागांतून प्रत्येकी चार नगरसेवक आणि एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जातील. या आधारावर भाजपने उमेदवारांची यादी तयार करणे सुरू केले आहे. १२५ नगरसेवक निवडून आणण्याच्या उद्देशाने काँग्रेसमधील ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील होणार आहेत, असे बोलले जात आहे. लवकरच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.