Rohit Pawar, Chandrakant Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News: 'मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत', चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांवरही टीकास्त्र

Pune Latest News: 'आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे,' असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

पुणे, ता. २५ जून २०२४

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात सर्रासपणे लहान मुले ड्रग्ज सेवन करत असल्याचा आणि विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंबंधी एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, असे मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांच्या याच विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत रोहित पवार?

‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथाइडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

"आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे. पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

तसेच अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

फडणवीसांवर टीकास्त्र!

सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरीअस व्हा! आजी- माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT