Rahul Gandhi Saam Tv
मुंबई/पुणे

Congress Rally Mumbai: मोठी बातमी! राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर वाहतूक पोलिसांचा आक्षेप, नेमकं कारण काय?

Rahul Gandhi Sabha Mumbai: राहुल गांधी यांच्या सभेमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याचा दावा वाहतूक शाखेकडून करण्यात आला आहे. यावरुनच आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. १७ ऑगस्ट २०२४

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची २० ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेवर आता मुंबई वाहतूक शाखेने आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांच्या सभेमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याचा दावा वाहतूक शाखेकडून करण्यात आला आहे. यावरुनच आता काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंती निमित्त राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईत सभेचे आयोजन केले आहे. मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या पटाखा (फटाका) मैदानावर ही सभा होणार असून राज्यातील नेते, कार्यकर्त्यांसह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही या सभेला उपस्थित राहणार आहेत.

मात्र काँग्रेसच्या मुंबईतील या सभेला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. नुकत्याच बंद करण्यात आलेल्या सायन ROB चे कारण देत वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे आक्षेप नोंदवला आहे. सायन आरोबी बंद झाल्यापासून वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतुकीवर ताण येत आहे. काँग्रेसची सभा कार्यालयीन दिवसात होत असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची भिती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, एक ऑगस्टपासून सायन ROB बंद केल्यानंतर मध्य मुंबईसह वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सायन ROB बंद झाल्यापासून फटाका मैदानात होणारी ही पहिलीच मोठी सभा आहे. काँग्रेसच्या या सभेला तब्बल वीस हजाराहून अधिक लोक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सभेमधून काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडणार आहे. अशातच वाहतूक पोलिसांनी आक्षेप नोंदवल्याने आता मुंबई काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT