Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा झटका, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Congress: परभणीमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

Priya More

Summary -

  • बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला.

  • यामुळे परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.

  • काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दुर्राणी यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेक नेते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. अशामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे परभणीमध्ये शरद पवार गटाची ताकद कमी होत काँग्रेसची ताकद वाढली आहे.

शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्ष प्रवेशाच कार्यक्रम पार पडला. काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीआंबिरे आणि बाबाजानी दुर्राणी यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या समर्थकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता बाबाजानी दुर्राणी यांना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोणते पद दिले जाणार आहे ते लवकरच समोर येईल. बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे परभणीमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.

दरम्यान, बाबाजानी दुर्राणी पहिल्यांदा २००४ मध्ये विधानसभेत आमदार झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत आमदार केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवारांसोबत गेले होते. पण काही काळानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT