Congress: आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता अजित पवारांच्या गटात जाणार

Madan Bhargad Switch to NCP: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
rashtrawadi
rashtrawadiSaam
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

rashtrawadi
Kolhapur: ज्योतिबाच्या डोंगरावर नेलं अन् बायकोला संपवलं, चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याचं भयानक कृत्य

मदन भरगड हे काँग्रेसमध्ये या प्रमुख पदावर कार्यकर्ते होते. त्यांची काँग्रेसमधील राजकीय कारकीर्द ही विविध स्तरांवर नेतृत्व करणारी राहिली आहे.

सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सदस्य.

सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष.

अकोला शहर जिल्हा काँग्रेस समिती (२००१ ते २०१६ पर्यंत).

अकोला शहर NSUI तसेच अकोला शहर युवक काँग्रेस समिती, माजी अध्यक्ष.

माजी महापौर अकोला महानगरपालिका, (२००७-२००९) या कालावधीत.

माजी नगरसेवक, अकोला महानगरपालिका (१९९६-२०१७)

माजी स्थायी समिती सदस्य, अकोला महानगरपालिका (२००२-२००४)

अकोला नगरपरिषद, विरोधी पक्षनेते. (१९९६ ते २००१).

राजकीय प्रवासात भरगड यांनी २०१९ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर अकोला पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा वंचितला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये पुनरागमन केलं होतं.

rashtrawadi
Beed Crime: 'आम्हाला मुलगाच हवा होता', सासरच्या जाचाला कंटाळली, घराबाहेर काढलं, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ

आता मात्र त्यांनी काँग्रेसमधून अखेरचा निरोप घेत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करून अकोल्यातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भरगड यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com