Maha Vikas Aghadi Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुंबईत आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?

Maha Vikas Aghadi Mumbai Melava : आज शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आज शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजेपासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) या पदाधिकारी मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचं नारळ फोडलं जाण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली जाऊ शकते. तसा निर्णय देखील झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवल्यास राज्यात ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

या पदाधिकारी मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या जाणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे, महाविकास आघाडीच्या या मेळाव्याला इंडिया आघाडीतील काही मित्रपक्षातील नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आदी घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची मेळाव्याला उपस्थिती असणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभेतही एकसंध राहून नियोजनबद्ध काम करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

CJI Bhushan Gavai: पश्चात्ताप नाही, जेलला जायला तयार; भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया|VIDEO

Jalgaon : ओल्या दुष्काळाची मागणी दुर्लक्षितच; जळगाव जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर कापसाचे नुकसान

Mumbai Metro 3 गेम चेंजर ठरणार, कुणाला होणार सर्वाधिक फायदा, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT