Distribution Of Money In Ghansoli Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: घणसोलीमध्ये मोठ्याप्रमाणात पैशांचे वाटप, स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उधळला डाव

Distribution Of Money In Ghansoli: नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील घणसोली सिम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पैशांचा पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पैसे वाटल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील घणसोली सिम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा डाव उधळून लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली सिम्प्लेक्स परिसरामध्ये नागरिकांना पैशांची वाटप केली जात होती. याची माहिती मिळताच स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पैसे वाटप करणाऱ्यांनी हातातील पैसे टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही रक्कम जप्त केली.

अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्याद्वारे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी केला आहे. मध्यरात्री विजय चौगुले आणि अंकुश कदम कार्यकर्त्यांसह आमने-सामने आल्याने घणसोली सिम्प्लेक्स परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पण पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण चिघळण्यापासून थांबले. सध्या या परिसरामध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT