Breaking News : जन्मदात्या आईनेच केली पोटच्या मुलांची हत्या, नवी मुंबईतील खळबळजनक घटना

नवी मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाळी येथे धक्कादायक घटना घडली आहे.
navi mumbai
navi mumbai saam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाळी येथे धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत आईनेच आपल्या २ लहान मुलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

navi mumbai
धक्कादायक! पत्नी मोबाईलवर बोलते, पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) घणसोली गावातील चिंचाळी येथे धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच पोटच्या २ लहान मुलांची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एक ४ वर्षाची मुलगी आणि १ वर्षाच्या मुलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. महिलेने मुलांची हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेने घणसोलीमध्ये खळबळ उडाली आहे.

navi mumbai
धक्कादायक! पत्नी मोबाईलवर बोलते, पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या

दरम्यान, महिलेने मुलांची हत्येचे केल्या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुलांच्या हत्या केल्यानंतर आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेला वाशी मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com