Amol Kolhe| Ajit Pawar Saamtv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: 'काळजी करु नका, शिरुरमध्ये उमेदवार निवडूनच आणणार...' अजित पवारांचे अमोल कोल्हेंना थेट आव्हान!

Ajit Pawar Vs Amol Kolhe: शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २५ डिसेंबर २०२३

Shirur Loksabha Election 2024:

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kohle) यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा हायहोल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणालेत अजित पवार?

"पाच वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होते.. असे अजित पवार म्हणाले. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे.." असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

अमोल कोल्हेंना थेट आव्हान!

"आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. पण शिरुरमध्ये (Shirur Loksaabha) आम्ही पर्याय देणार, तुम्ही काळजीच करु नका. तिथे असलेला उमेदवार निवडणून आणणारचं.." असे थेट आव्हानही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींशिवाय पर्याय नाही...

"महायुतीचे (Mahayuti) पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी आहेत, समोर कोणी आहे का? प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे. मोदी साहेब पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे. मी स्पष्ट बोलणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणी ही उमेदवार योग्य नाही.. असेही अजित पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT