Manoj jarange Patil: 'मिळेल त्या वाहनाने, सर्व साहित्य घेऊन मुंबईत या...' जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन; भुजबळांवर टीका

Manoj jarange Patil: हे आंदोलन खुप मोठं आहे त्यामुळं कोणी घरी राहू नये. मिळेल त्या वाहनाने,सर्व साहित्य एकत्र सोबत घेउन या... असे मनोज जरांगे म्हणालेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर| ता. २५ डिसेंबर २०२३

Chhatrapati Sambhajinagar News:

बीडच्या इशारा सभेमधून २० जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. या उपोषणात ३ कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मिळेल वाहनाने, साहित्य घेऊन मुंबईकडे या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. छत्रपती संभाजनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"महाराष्ट्रातले साखळी उपोषण स्थगित करण्यात यावे कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागत आहे. हे आंदोलन खुप मोठं आहे त्यामुळं कोणी घरी राहू नये. मिळेल त्या वाहनाने,सर्व साहित्य एकत्र सोबत घेउन या. हे आंदोलनं आपल्याला यशस्वी करायचं आहे.कारण शेवटचं आंदोलनं असणार आहे..." असे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) म्हणालेत.

"उद्या ओबीसींचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे. आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही..' असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तसेच 144 लागू केल्यामुळे आम्ही 20 तारीख निश्चित केल्याचेही जरांगे पाटलांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Shambhuraj Desai: ...तर जरांगे पाटलांना दिल्लीला सोबत घेऊन जाणार...; मराठा आरक्षणावर शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य

भुजबळांवर निशाणा

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे. ओबीसींचे वाटोळे करण्याचे काम भुजबळांनी केले. असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. तसेच गावाकडे आमचे आणि ओबीसी चे चांगले संबंध आहेत. असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Solapur Latest News : 'सोलापूर'वरुन भाजपच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध; नेमकं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com