Chhagan Bhujbal and Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO: काल मोठी टीका, आज शरद पवारांची भेट घेणार; छगन भुजबळ 'सिल्व्हर ओक'वर वेटिंगवर

Maharashtra Politics Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Gangappa Pujari

सचिन गाड| मुंबई, ता. १५ जुलै २०२४

राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काल बारामतीच्या सभेतून छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला होता. त्यानंतर आज थेट ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

राज्याच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत आहे.

कालच्या बारामतीच्या सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. शरद पवार यांच्या फोननंतरच विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला, असा मोठा आरोप त्यांनी केला होता. या सर्वात मोठ्या टीकेनंतर आज छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे. याच संदर्भात ही भेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. राजकीय विरोध असला तरी भेटी होतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता; तुमचंही नाव आहे का?

मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT