विनोद जिरे, साम टीव्ही बीड
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बीडच्या माजलगावमध्ये भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले आहेत. माजलगाव शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली (Beed Politics) आहे. माजलगाव परिसरातील ब्रह्मगावचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी हे बॅनर लावले आहेत. दरम्यान या बॅनरवरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडेंचे 'भावी उपमुख्यमंत्री' म्हणून पोस्टर
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगताना दिसतेय. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची चुरशीची लढत होण्याची चिन्हे ( Pankaja Munde Banner ) आहेत. आता पंकजा मुंडेंचे 'भावी उपमुख्यमंत्री' म्हणून पोस्टर बीड जिल्ह्यात झळकले आहेत. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. पंकजा मुंडे 'भावी उपमुख्यमंत्री' असणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
लोकसभेतील पराभवानंतर (Maharashtra Politics) आता विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या ९ उमेदवारांचा विजय झालाय. यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील विजय झालाय. त्यामुळे महायुतीत सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता पंकजा मुंडेंचे 'भावी उपमुख्यमंत्री' असे म्हणत अभिनंदन केल्याचे पोस्टर माजलगावमध्ये झळकल्याचं समोर आलंय.
विधानपरिषदेतील विजयानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पाच वर्षानंतर मला पुन्हा एकदा राज्यात काम करण्याची संधी मिळालीय. पुन्हा एकदा सक्रियपणे काम करेल. दोन समाजांच्या जातीचा प्रश्न सध्या निर्माण झालेला (Beed News) आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राजकारणामध्ये एकदाच खोटं बोलून मत मिळवता येतात. मात्र, पुन्हा एकदा अशा पद्धतीने मतं मिळवता येणार नसल्याचं विधानपरिषदेतील विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.