Bajarang Sonwane News : माझ्यावर टीका करू नका, अन्यथा त्या कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल; बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडे यांना इशारा

Beed News : महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे सभा घेतली असून या प्रचार सभेत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे
Bajarang Sonwane
Bajarang SonwaneSaam tv

बीड : धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात, याच्या माझ्याकडे चार कॅसेट आहेत. (Beed) त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करू नये. अन्यथा मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील; असा थेट इशारा बजरंग सोनवणे यांनी (Dhananjay Munde) आमदार धनंजय मुंडे यांना दिला आहे. (Live Marathi News)

Bajarang Sonwane
Bribe Case : ग्रामसेवकाने घेतली ५० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे सभा घेतली असून या प्रचार सभेत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात. मात्र त्यांचा बहुरंगी पणा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग असून दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bajarang Sonwane
Sambhajinagar Accident : हायवाची रिक्षाला मागून जोरदार धडक; अपघातात १३ जण गंभीर जखमी

प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी संसदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून संसदेत त्या कधीच बोलल्या नाहीत. तर दहा वर्ष खासदार असताना बीड जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला? हे त्यांनी सांगावं; अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर देखील टीका केली..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com