Sambhajinagar Accident : डंपरची रिक्षाला मागून जोरदार धडक; अपघातात १३ जण गंभीर जखमी

Sambhajinagar News : अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमीमध्ये ८ वृद्धांचा समावेश आहे
Sambhajinagar Accident
Sambhajinagar AccidentSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे घडला. (Latest Marathi News)

Sambhajinagar Accident
Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर आणि रिक्षाचा (Accident) अपघात झालाय. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या डंपरने प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका अँपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात जवळपास १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर (Dhule Solapur Highway) घडलेल्या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दखल करण्यासाठी मदत केली. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) हलवण्यात आले असून जखमीमध्ये ८ वृद्धांचा समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sambhajinagar Accident
Bribe Case : ग्रामसेवकाने घेतली ५० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

अपघातानंतर हायवा घेऊन चालक फरार  

दरम्यान ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये रिक्षाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात होताच डंपर चालकाने वाळूच्या डंपरसह घटनास्थळावरून धूम ठोकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com