Maharashtra Political News SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ब्रेकिंग! भाजपकडून विधानपरिषदेचे ३ उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरसाठी तिरंगी लढतीची शक्यता

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: भारतीय जनता पक्ष विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर सहित कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर मुंबई|ता. ३ जून २०२४

लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्याच्या राजकारणात विधानसभा परिषदांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आज शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोंकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना पक्षाकडून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता कोकण भवन येथून उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून अभिजित पानसे यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्ष विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई शिक्षक व पदवीधरसहित कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण पदवीधर मध्ये निरंजन डावखरेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुंबई शिक्षकमध्ये शिवनाथ दराडे आणि मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार यांना संधी देण्यात आली आहे. रमेश कीर यांना कोकण पदवीधर मधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब मुंबई पदवीधरसाठी आज भरणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज. मो अभ्यंकर सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे जाऊन भरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT