Uddhav Thackeray  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; सोशल मीडियावर पोस्ट करत केला 'जय महाराष्ट्र'

Tejasvi Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Priya More

Summary -

  • महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसला

  • तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेची साथ सोडली.

  • त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाला रामराम ठोकला

  • त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सकाळी १० वाजता दादरच्या वसंत स्मृतीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्वी या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.

तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी आज शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून भावनिक पत्राद्वारे निर्णयाची माहिती दिली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आयुष्यात मोठा बदल झाल्याचा उल्लेख त्यांनी यामध्ये केला. दोन लहान मुलांची जबाबदारी आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसंच, पद किंवा पक्षापेक्षा मनापासून साथ देणाऱ्या ताकदीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसैनिकांनी दिलेल्या प्रेम, आधार आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजासाठी प्रामाणिक काम आणि मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

तेजस्वी घोसाळकर यांचा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. तेजस्वी घोसाळकर या गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. तसंच, त्या शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याची देखील चर्चा होत होती. भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेवर त्यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्या भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला.

मुंबै बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती होण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी १३ मे रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेजस्वी घोसाळकर यांचे पती विनोद घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये हत्या करण्यात आली होती. ते त्यावेळी मुंबै बँकेवर संचालक होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर तेजस्वी यांची नुयुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik- Akkalkot Expressway: नाशिक-अक्कलकोट फक्त ४ तासांत, सहा लेनचा सुपरहायवे, वाचा कसा असेल हा मार्ग

मोठी बातमी! आज आचारसंहिता लागणार, २९ महापालिका निवडणुकीची घोषणा होणार

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या त्या 'सावली'ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे लोकार्पण सोहळा

गिरिजा ओक, गौतमी पाटील ते प्रणित मोरे; Bigg Boss Marathi 6 साठी कोणाच्या नावांची चर्चा

SCROLL FOR NEXT