Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Tanaji Sawant Son Applies for BJP Ticket: पुणे महानगरपालिका निवडणुकीत मोठी धक्कादायक घटना घडलीय. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांना भाजपकडून उमेदवारी हवी आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी अर्ज केल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे.
Tanaji Sawant Son  Applies for BJP Ticket
Giriraj Sawant, son of former minister Tanaji Sawant, seen outside the BJP office in Pune.saam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात अर्ज.

  • शिंदे गटातील माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा भाजपकडे अर्ज.

  • राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, पक्षांतराच्या चर्चा सुरू.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज मागितले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जवळपास 2500 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. यामध्ये अनेक विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सुद्धा भाजपचा अर्ज भरल्याची माहिती आहे.

यामध्ये एक धक्कादायक नाव समोर आलs आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये आपला अर्ज दाखल केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Tanaji Sawant Son  Applies for BJP Ticket
Rahul Gandhi vs Amit Shah: राहुल गांधींचं ओपन चॅलेंज,अमित शहा भडकले; भर संसदेत तुफान शाब्दिक राडा

यामध्ये एक धक्कादायक नाव समोर आला आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये आपला अर्ज दाखल केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती ही पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालय बाहेर तानाजी सावंत यांच्या जे एस पी एम संस्थेची एक कार अचानक आली आणि त्यामध्ये सावंत यांच्या संस्थेतीलच काही कर्मचारी होते. त्यांच्या हातात होता तो ताणजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज.

Tanaji Sawant Son  Applies for BJP Ticket
Local Body Election: आधी कुस्ती नंतर दोस्ती; सांगोल्यात जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमधील वाद मिटला?

काही वेळातच या या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या कार्यालयात दाखल केला आणि ते तिथून निघून गेले. याबाबत गिरीराज सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना हा आमचा पक्ष आहे. आमच्या घरात आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा घेण्याचा संबंध येत नसल्याचं म्हटलं आहे. जरी गिरीराज सावंत यांनी या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे म्हटलं असलं तरी खात्रीलायक सूत्रानुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधून गिरीराज सावंत यांनी अर्ज भरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com