harshvardhan patil meet sharad pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील 'तुतारी' हाती घेणार? शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Harshvardhan Patil Meet Sharad Pawar: आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये यंदा आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. या मतदारसंघामध्ये देखील जोरदार घडामोडी घडत आहेत. या ठिकाणचे माजी मंत्री आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशामध्येच आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार असल्याचे निश्चित झालं असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये बदल झाले होते. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर भाजपचे कमळ चिन्ह दिसले नव्हते. याआधी ते माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते आणि कमळ चिन्हही ते वापरत होते. पण त्याच्या पोस्टमध्ये दिसलेल्या बदलावरून त्यांच्या शरद पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताने देखील आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर शरद पवार गटाचे तुतारी असलेल्या माणसाचे चिन्ह ठेवले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. आज मुंबईत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटीलसुद्धा उपस्थित होत्या.

हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले जात आहे. हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील खरं पण त्यांना इंदापूरमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT