Bharat Gogawale Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मंत्रीपद, पालकमंत्रीपदाची हुलकावणी, भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारणार का?

Bharat Gogawale: शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे आता अजित पवार गटात नाराजी पाहायला मिळत आहे.

Priya More

शिवसेनेचे नेते तसेच प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती केल्यामुळे भरत गोगावले पदभार स्वीकारतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेतील आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील, संजय शिरसाट यांना महामंडळ मिळाल्यामुळे राजकारण तापल होतं.

आता शिवसेनेच्या आणखीन एका आमदाराची नियुक्ती महामंडळावर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा होत आहे. सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रीपदाचे वाटप होत असल्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भरत गोगावले यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हे पद दिले त्याला खूपच उशीर झाला आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आचारसंहितेला १५ ते २० दिवसांचा कालावधी बाकी आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू. या चर्चेनंतरच पदभार स्वीकारायचा की नाही हे ठरवू.', असे सांगितले. त्यामुळे आता भरत गोगावले हे पद स्वीकारतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. आज दुपारपर्यंत त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, भरत गोगावले यांना पहिल्या कॅबिनेट विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. पण त्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे ते नाराज होते. ते मंत्रिपदाची वाट पाहत होते. पण आता त्यांची थेट एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते पद स्वीकारणार की नाही हे लवकरच कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर

Shukra Shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची होणार युती; नव्या वर्षात 'या' राशींची होणार चांदीच चांदी

Shah Rukh Khan : शाहरूखच्या जीवावर कोण उठलं? सलमाननंतर किंग खानला धमकी

Maharashtra Politics : 'मुंडे भावडांनी परळीतली जमीन बळकावली'; ऐन निवडणुकीत सांरगी महाजनांचा गंभीर आरोप, VIDEO

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून ठाकरेंमध्ये दिवार, महायुतीसाठी जमीन सुपीक होणार?

SCROLL FOR NEXT