Cabinet Expansion: आमदार संतोष बांगर मंत्रीपदाच्या शर्यतीत! मुंबईत तळ ठोकला, भरत गोगावले, संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

Maharashtra Politics Breaking News: लोकसभा निवडणुकांनंतर महायुतीमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार? कुणाचा पत्ता कट होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
 Cabinet Expansion: आमदार संतोष बांगर मंत्रीपदाच्या शर्यतीत! मुंबईत तळ ठोकला, भरत गोगावले, संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
Santosh Bangar NewsSaamtv

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मंंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच आता हिंगोलीचे आमदार संतोष बांगरही मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाड्यात शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे देखील आता मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार असल्याने संतोष बांगर कालपासून मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी बांगर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मागणी लाऊन धरली आहे. मंत्रिमंडळाच्या शर्यतीत बांगर यांची इंट्री झाल्याने मात्र शिवसेना आमदार भरत गोगावले संजय शिरसाठ यांच्यासारख्या नेत्यांच्या उंचावल्या आहेत.

 Cabinet Expansion: आमदार संतोष बांगर मंत्रीपदाच्या शर्यतीत! मुंबईत तळ ठोकला, भरत गोगावले, संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
Maharashtra Politics : शिवसेनेचा पराभव करणं नारायण राणेंना कधीच जमणार नाही; ठाकरे गटाचा हल्लाबोल

दरम्यान, येत्या 27 जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? कोणती खाती बदलली जाणार अन् कोणाचा पत्ता कट होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 Cabinet Expansion: आमदार संतोष बांगर मंत्रीपदाच्या शर्यतीत! मुंबईत तळ ठोकला, भरत गोगावले, संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?
Crime News: मोबाईलचा वाद, जिवलग मित्रानेच केला घात! बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कन्नड शहरातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com