Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार, आता पुढे काय?

शिवसेना पक्षप्रमुख या पदाचं नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : राज्यात एकीकडे आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. कारण, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख या पदाचं नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Political News)

शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार, पक्षप्रमुख पदाची निवड ५ वर्षांनी केली जाते. ही निवड प्रतिनिधी सभेची बैठक घेऊन केली जाते. ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर पुन्हा ही निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )आणि शिंदे असे दोन गट पडल्याने पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे.

त्यामुळे जर ठाकरे गटाला पक्षप्रमुखपदावर निवड करायची तर ती कुठल्या नावानं करायची? शिवसेना या नावानं, की शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानं, हा प्रश्न आता ठाकरे गटासमोर आहे. राजकीय लढाईत पक्षाचं चिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाला सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे.

विशेष बाब म्हणजे २० जानेवारीला झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुखपदाचं काय होणार याचा कुठलाच उल्लेख नाही. एकप्रकारे कुठलाच प्रतिसाद न देता ३० जानेवारीपर्यंत पुढची तारीख दिल्यानं स्थिती जैसे थे ठेवण्यासच आयोगानं अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख हे पद सध्या सर्वोच्च आहे. पण त्याच पदाबाबत काही महत्वाचे प्रश्न शिंदे गटानं आयोगात उपस्थित केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आयोगाच्या अंतिम निकालात त्याबाबत काय भाष्य होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT