Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत; PM मोदींकडे व्यक्त केली इच्छा

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.
Bhagat Singh Koshyari News
Bhagat Singh Koshyari NewsSaam Tv

Bhagat Singh Koshyari Resignation : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना, राज्यपाल कोश्यारींनी ही विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra Political News)

Bhagat Singh Koshyari News
Eknath Shinde : शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. (Latest Marathi News)

त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.  

Bhagat Singh Koshyari News
Shivsena-VBA Alliance: आमचं फार जुनं भांडण आहे...; युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांकडे व्यक्त केली ही अपेक्षा

राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com