Uddhav Thackeray On Farmer Loan Waiver Issue Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : शेतकरी कर्जमाफी द्या, उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी, CM शिंदेंनाही टोमणा

Uddhav Thackeray On Farmer Loan Waiver Issue: उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले.

Priya More

'शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. निवडणुकीआधी कर्जमाफी जाहीर करावी.', अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. 'नुसत्या घोषणा करू नका. अंमलबजावणी करत असाल तर पहिली अंमलबजावणी करा आणि नंतर निवडणुकीला सामोरे जा.', असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष काय परिस्थिती भोगत आहेत हे कळाले. अमरावती जिल्ह्यामध्ये रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. हे घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांची शेती पंचतारांकीत आहे. असा कोणताच शेतकरी नाही जो हेलिकॉप्टरने शेतात जातो. महाराष्ट्रात अनेक राज्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. त्याबाबत यांना काहीच संवेदना नाही.'

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा सांगत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत १०४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रोज ९ शेतकरी आपले आयुष्य संपवत आहेत. शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही. यांनी फक्त ज्या घोषणा केल्या आहे. १० हजार कोटी नुकसान भरपाई देणे अजून बाकी आहे. त्यांनी जाहीर केलेले आकडे फक्त कागदावर आहेत. पण शेतकऱ्यांच्या हातात आणि खात्यात पैसे येणे बाकी आहे. राज्यात चित्र-विचित्र गोष्टी चालल्या आहेत. शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचे पैसे मिळाले नाही.'

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात मी २ लाख रुपयांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. आता तुमच्या घोषणा खूप झाल्या. निवडणुकीच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी. नुसत्या घोषणा करू नका अंमलबजावणी करत असाल तर पहिली अंमलबजावणी करा नंतर निवडणुकीला सामोरे जा.'

तसंच, उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारवर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, 'उद्यापासून अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडेल हा गाजरासारखा असेल. कारण निधी खर्च होणार नाही. घोषणांचा पाऊस खूप झाला. सरकारला संवेदना असतील तर गेल्या २ वर्षांत केलेल्या घोषणांची किती पूर्तता झाली हे खऱ्या मनाने त्यांनी सांगावे. खोटे सरकार याला म्हणतात. केंद्र आणि राज्य हे महागळती सरकार आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली. मंदिर आणि पेपर लीक होत आहे. आम्ही काही म्हणणे मांडले तर ते आमच्यावर आरोप करतात. आता अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जातील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT