Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक १७ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी पुन्हा वाढली, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

बंडू आंदेकर याच्या घरी छापेमारी करताना पोलिसांशी घातली होती हुज्जत

मिथुन चव्हाण आणि प्रशांत पवार अशा गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही वकिलांची नावे

२ दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याच्या घरी पुणे पोलिसांनी केली होती छापेमारी

हाऊस सर्च परमिशन आहे का? असा जाब या कोणी वकिलांनी पुणे पोलिसांना विचारला होता

सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल

रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

परवेज हमदुले अस मृत व्यक्तीचे नाव

पुण्यावरून श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या थार जीपची दोन मोटार सायकलना धडक

श्रीवर्धन बाजार पेठेतील घटना

अपघातात एक तरुण जागीच ठार

०अपघातग्रस्त थार आणि थारमधील 3 जणांना पोलिसांनी घेतल ताब्यात

काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार, स्थानिक नेत्यांच्या हाती सवाल

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष समविचारी

स्थानिक पातळीवर दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी युती होऊ शकते.

तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस काही ठिकाणी एकत्र लढलेले आहेत.

स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीला युती होऊ शकते.

शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

हल्ल्याने शिर्डीत खळबळ, तरुण गंभीर जखमी...

हल्लेखोर पसार झालेत. उपचारासाठी आधी साईसंस्थानच्या रुग्णालयात आणि नंतर नाशिक येथे हलवले. निरज चौधरी असे जखमी युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू.

मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना अटक होणार?

- माणिकराव कोकाटे आणि त्याचे बंधू विजय कोकाटे यांच्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना मिळाली

- सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कार्यवाही करणार

- शिक्षेविरोधात कोकाटे यांनी देखील मुंबई उच्चन्यायालयात दाखल केली आहे याचिका दाखल

- शुक्रवारी होणार आहे कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी

Kolhapur : कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची संकल्प महासभा, निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार

वंचित बहुजन आघाडीची कोल्हापुरात भव्य विजयी संकल्प महासभा

महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच राज्यातली पहिली सभा कोल्हापुरात

कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात सुरू झाली आहे सभा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर सभेला करणार संबोधित

महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची दिशा होणार स्पष्ट

मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सांगली : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत आपल्याला माहित नाही आणि त्यांच्या राजीनामाची कुठलीही चर्चा मंत्रिमंडळात झाली नाही. मंत्रिमंडळाच्या सदस्यांमध्ये देखील झाली नाही,अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास? 

मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

- नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर उड्डाणपुलावर एसटी बसला आग लागल्याची घटना

- एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या एसटी बसला आग लागल्याची घटना

- बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी वर्कशॉपला जात असताना लागली एसटी बसला अचानक आग

- सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने टळली मोठी दुर्घटना

कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

तातडीची सुनवाणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

ॲड. अनिकेत निकम यांनी तातडीची सुनवाई घेण्यासाठी न्यायालयाकडे केला होता अर्ज

न्यायमूर्ती लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद

माणिकराव कोकाटे यांचे वकील उपस्थित होते

कोकाटेंना तातडीचा दिलासा द्यायला कोर्टाचा नकार

19 डिसेंबरला होणार सुनावणी

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

काम करा अन्यथा खुर्ची खाली करा मागणी करण्यासाठी आंदोलन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय वाकडेवाडी येथे आंदोलन सुरू

ऑक्सिजन मास्क लावून कार्यकर्ते आंदोलन करत आहे

मनसे कार्यकर्ते प्रदूषण महामंडळ कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करत आहेत

अधिकाऱ्यांची बदली करा, अशी मागणी करण्यात येतेय

बुलढाण्यात नायलॉन मांजाने युवकाचा गळा चिरला; तरूण गंभीर जखमी

संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण परिसरात नायलॉन मांजामुळे एका युवकाचा गळा चिरल्याने युवक गंभीर जखमी झाला. काल सायंकाळी संग्रामपूर येथील शेख अनिस शेख गफार हा युवक आपले काम आटपून घराकडे दुचाकीने निघाला असता रस्त्याने जाताना वडगाव वान गावाजवळ नायलॉन मांजामुळे युवकाचा गळा चिरल्याने युवक गंभीर जखमी झाला त्यावर अकोला येथील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा एरनीवर आला आहे...

पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोलवली मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

शिवसेना मनसे पुणे शहर बैठकीनंतर बोलावली महत्त्वाची बैठक

उपनेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित असणार

महापालिका निवडणुकीत रणनीतीबाबत चर्चा होणार

उद्या सकाळी ११ वाजता बोलवली बैठक

पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभी केली प्रयोगशाळा

पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच प्रयोगशाळा बनवल्याचं समोर आलं आहे

प्रयोगशाळेत तयार करत होता लाखो रुपयांचा गांजा

परदेशातून कच्चा माल आणून तयार करत होता गांजा

लाखो रुपयांचे मशीन सह गांजा पोलिसांनी केला जप्त

या प्रकरणी ५ आरोपींकडून ३.४५ कोटी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त

निवडणूक व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

आगामी निवडणुका आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोव्यावरून कर चुकवून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे ७० लाख रुपये किमतीचा महागड्या दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

महानगरपालिका लागल्यानंतर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून माजी महापौर प्रताप देशमुख यांनी पदाधिकारी कार्यकर्त्याची बैठक घेतली आहे महानगरपालिकेचे पहिले महापौर प्रताप देशमुख यांनी मी निवडनुक लढणार नाही असा बैठकीत निर्धार केला आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटात असलेले अक्षय देशमुख यांनीही बैठक घेत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. येणारी निवडणूक युतीमध्ये न जाताना आम्ही स्वतंत्र लढण्याचे दोन्ही गटांनी ठरवले आहे.

महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

युतीची आज बैठक

भाजपा शिवसेनेटी ⁠ठाण्यात होणार बैठक

⁠ठाणे जिल्ह्यातील मनपा निवडणुकांसाठी होणार बैठक

पक्षीय बलाबलनुसार जागा वाटपांवर होणार चर्चा

⁠भाजपा आणि शिवसेना ठेवणार एकमेकांसमोर जागावाटपांचे प्रस्ताव

⁠भाजपाकडून प्रमुख जबाबदारी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे तर शिवसेनेतून प्रमुख जबाबदारी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे

⁠दोन बैठकीत जागांचा तिढा सोडवण्याचा वरीष्ठांचा आदेश

पुण्यातील वारजे परिसरात विचित्र अपघात

पुण्यातील वारजे परिसरात रात्री १२.३० वाजता अपघात

वारजे परिसरातील RMD सिंहगड स्प्रिंगडेल शाळेजवळ हा अपघात घडला

7-8 वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात टेम्पो, ट्रक आणि चार चाकी वाहनांचा समावेश

अपघातात वाहनांचे मोठे नुकसान

Buldhana: डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्ध्यावर; अपघातात विद्यार्थिनींचा मृत्यू!...

कॉलेजला जात असताना समोरून दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील डोंगरशेवली गावाजवळ घडली. ॠतूजा सावळे(१९ वर्ष, रा. डोंगरशेवली) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. काल सकाळी महाविद्यालयाला जात असतानाच समोरून येणार्‍या दुचाकीने ॠतूजाला धडक दिली. एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले आणि ती खाली कोसळली.

Powai: IIT मुंबईचा वार्षिक कार्यक्रम मूड इंडिगो रद्द

वाहतूक कोंडी मुळे मुंबईकरांना जो मनस्ताप झालेला त्या मुळे मूड इंडिगो रद्द

आई आई टी मुंबई ने घेतला निर्णय

काल दिवस भर पवई , साकी नाका, चांदिवली विभागात ट्रॅफिक जाम

Wardha: वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बसची तपासणी मोहीम

- तपासणीदरम्यान विविध त्रुटी आढळल्यामुळे ७ स्कूल बस, स्कूल व्हॅनवर दंडात्मक कारवाई

- १ लाख २४४ रुपयांचा कर वसूल

- नियम डावलून स्कूल बस, स्कूल व्हॅन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले

Latur: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काँग्रेसला उतरती कळा लागल्याच दिसत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह काही नगरसेवक यांनी सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय ,त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या लातूर शहर महापालिकेत यावेळी निवडणुकीआधीच काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसतंय., काँग्रेसचे नेते तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची या निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढू असे संकेत स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर दौऱ्यावर असताना दिलेत

Chhtrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधील  सिव्हिल हॉस्पिटलचे किमोथेरपी सेंटर बंदच

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंद असल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ६ डिसेंबरला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात अचानक पाहणी केली. तेव्हा किमोथेरपी सेंटर बंद असल्याचे पाहून आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र, सात दिवसांनंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंदच आहे. बंद किमोथेरपी सेंटरप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजवण्यात आली आहे. सात दिवसात बंद पडलेले सेंटर सुरू न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचेही नोटीसित नमूद करण्यात आले आहे.

Kokan: कोकणातील थंडी आंब्यासाठी पोषक....

कोकणातील सध्याचे वातावरण आंबा अर्थात हापूस आंब्यासाठी पोषक आहे. रात्री पडणारी थंडी यामुळे आंबा मोहरासाठी पोषक वातावरण असल्याचे बागायतदार सांगतात. सध्या कोकणात रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी आणि दिवसा कडकडीत ऊन असं वातावरण आहे. त्यामुळे वातावरण बदलाने मागील काही महिने चिंतेत असलेला हापूस उत्पादक शेतकरी सध्या वातावरणाच्या बाबतीत समाधान व्यक्त करतोय. लांबलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा कमी प्रमाणात असणार आहे

आरक्षणासाठी 21 जानेवारीला राज्यातील धनगर बांधवांचा मोर्चा मुंबईला धडकणार

आमचं सरकार आल्यावर आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो धनगरांच्या समोर जाहीर सभेत आश्वासन दिले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचा प्रश्न सोडवतो.. मग आता क्या हुआ तेरा वादा? पण मात्र अजूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही त्यामुळे 21 जानेवारीला राज्यातील सखल धनगर समाज मुंबईच्या दिशेने कुच करणार असून लाखोंचा मोर्चा हा मुंबईला धडकणार असल्याचं धनगराच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे दीपक बोऱ्हाडे यांनी अमरावती येथे धनगर समाज बांधवांच्या बैठकीमध्ये सांगितलं, तुम्ही दिलेल आश्वासन तुम्ही पाडले नाही,जर सरकार आम्हाला फसवत असल तर सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मतं नाही हा नारा घेऊन आम्ही प्रत्येक धनगर वाड्यात तांड्या वस्तीत जाऊ, असा थेट इशारा दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला दिला आहे

 Washim: १ लाख ७७ हजार रुपयांच्या डेटोनेटरचा साठा वाशिम गुन्हे शाखेने केला हस्तगत....

वाशिम जिल्ह्यात एक्सप्लोसिव्ह साहित्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी चोरी गेलेल्या विहीर फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांच्या डेटोनेटरचा साठा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सावरगाव बरडे शेतशिवारात छापा टाकत सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवून ठेवलेले सात नायलॉनच्या गोण्यांमधील डेटोनेटर जप्त करण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत.

लातूर महापालिका महायुतीत एकत्र लढू;मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच विधान

राज्यात महायुतीचे संकेत देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील प्रत्येक महानगरपालिकेत युती करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत , युतील 13 इतर पक्षांसोबत देखील आम्ही चर्चा सुरू केली आहे, त्यामुळे लातूर महानगरपालिका निवडणुकी महायुती होणार असल्याचे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर येथे दिले आहेत,

Amravati: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ; 1 लाख 64 हजार 532 मतदारांची नोंद

वाढलेल्या मतदारांमुळे 53 नवे मतदान केंद्र.एकूण मतदान केंद्रांची संख्या 786 वर.

अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली;मनपा निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात

प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी पूर्ण; मतदार सुविधांवर विशेष भर देण्यात येणार

Pune: पुणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली

गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) सातत्याने ‘मध्यम’ (१०१-२००) ते ‘खराब’ (२०१-३००) या श्रेणीत

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती, कचरा जाळण्यावर कडक बंदी, बांधकाम स्थळांवरील धूळ नियंत्रण आणि नियमांचे पालन न करणाऱ्या ठिकाणी काम बंद करण्याच्या उपायांचा आता होणार समावेश

शहरात ऑक्टोबर २०२५ पासून १५ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या सुमारे ७६ दिवसांपैकी तब्बल ४८ दिवस ‘मध्यम’ एक्युआय नोंद

डिसेंबर महिन्यातील ६ दिवस ‘खराब’ श्रेणीत एक्युआय नोंद

Sangli: सांगली महापालिकेच्या निवडणूकसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची तयारी

महानगरपालिकांच्या निवडणुकींचे बिगुल वाजताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने देखील आपली तयारी पूर्ण केली. महापालिका क्षेत्रातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 4 लाख 54 हजार 430 मतदारांची नोंद महापालिका क्षेत्रात झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आचारसंहिता कक्ष आणि तक्रार निवारण कक्षही कार्यान्वित करण्यात आलेत. तत्काळ तपासणी पथक, व्हिडिओ चित्रीकरण पथकाची नियुक्ती करण्यात आली. तर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीवर 11004 हरकती आल्या होत्या. यापैकी 9486 तक्रारी मान्य करण्यात आल्या तर 1536 हरकती अमान्य करण्यात आलेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये कडक आचारसंहितेचे पालन करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.

Nashik: नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोन साखळी चोरीची घटना

- घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

- अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंटमध्ये घडली घटना

- डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या भामट्याने खेचली सोन साखळी

- सोन सकाळी खेचत असताना महिलेचा आरडाओरड करत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद

- सोनसाखळी चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Amravati: अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात स्कायवॉकजवळ इतरही आकर्षक स्थळे विकसित होणार

विदर्भाचे काश्मीर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात स्कायवॉकजवळ इतरही आकर्षक स्थळे विकसित होणार.

जिल्हाधिकारी यांनी पर्यटनवाढीवर भर देण्याचे आवाहन केले.

चिखलदरा हे अमरावती जिल्ह्याचे प्रमुख पर्यटनस्थळ असल्याचे नमूद.

पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा वाढवण्यावर प्रशासनाचा भर.

जंगल सफारी व निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय.

स्थानिक आदिवासी संस्कृतीचे जतन व प्रचार करण्यावर भर.

विविध विभागांच्या समन्वयातून विकास आराखडा राबवणार.

चिखलदरा पर्यटन नकाशावर अधिक आकर्षक ठरणार अशी पर्यटकांना अपेक्षा.

शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली अमित शहा यांची भेट

गृहमंत्री अमित शहा यांची माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्या मागील काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूक प्रचारात सातपुते आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आले होते.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत मला जेलमध्ये टाका मी सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे अशी भूमिका घेतली होती. दरम्यान अकलूजमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

Nagpur: नागपूर महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला महायुतीत किमान १५ टक्के जागेची मागणी

- सन्मान जनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याचा तयारीत

- आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक.

- गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार.

- शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा पक्षाचा दावा.

Yavatmal: यवतमाळमध्ये दोन दिवस होणार टपाली मतदान

यवतमाळ नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 18 व 19 डिसेंबर रोजी टपाली मतदान घेतले जाणार आहे. त्यांना टपाली मतपत्रिकेचे वितरण करण्यात आले असून हे मतदान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडणार आहे. शहरातील धामणगाव रेल्वे मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन येथे मतदान घेतले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस करणार तेजवानी आणि रवींद्र तारू यांची एकत्रित चौकशी

तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी सहदुय्यम उपनिबंधक रवींद्र तारूशी संगनमत करून जिल्हा उद्योग केंद्राचे आवश्यक प्रमाणपत्र न घेता मुद्रांक शुल्कात माफी दिल्याचे भासवून जमीन विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी केली

बावधन पोलिसांनी दिली न्यायालयाला माहिती

आरोपींनी २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून आर्थिक फायदा घेतला असून, या रकमेसह आरोपींच्या आर्थिक हितसंबंधांचा पोलिस करणार तपास

बावधन पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात ‘प्रॉडक्शन वॉरंट’ घेऊन खडक पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तेजवानीला अटक केली

२३ डिसेंबर पर्यंत तेजवानी ला पोलिस कोठडी

भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात शेतकऱ्यांवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला

- प्रकाश विठ्ठल कीचक अस जखमीच नाव आहे, ते गाई-म्हशी चारताना जंगलालगत हल्ल्यात गंभीर जखमी.

- दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला, प्रसंगावधान राखत कीचक यांनी अस्वलाशी झुंज दिली, आरडाओरड केली.

- गावकऱ्यांनी धाव घेत जखमीला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

- उपसरपंच संजय ढोक आणि पोलीस पाटील डहारकर यांनी वनविभागाला माहिती दिली.

- उमरेड वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी सक्रिय, वरिष्ठांना कळविले, त्यानंतर जखमीला नागपूर मेडिकलला हलवले.

- घटना एफडीसीएम वन महामंडळाच्या हद्दीत घडल्याची माहिती.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे "लक्ष्य" पिंपरी चिंचवड

काल पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील ३२ प्रभागातील इच्छुकांच्या अजित पवारांनी घेतल्या मुलाखती

शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी घेतली अजित पवारांची भेट

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक प्रमोद कुटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार असल्याचा अजित दादांचा दावा

Ambernath: गोळीबार प्रकरणी योग्य फिर्याद नोंदवण्याच्या मागणीसाठी अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे ठिय्या आंदोलन

अंबरनाथ पश्चिम परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी फिर्यादी पवन वाळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तशीच फिर्याद नोंदवली जावी, या मागणीसाठी आज पहाटे अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांकडून योग्य पद्धतीने फिर्याद घेतली जात नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या ठिय्या आंदोलनात कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य गुलाबराव करंजुले, तसेच फिर्यादी पवन वाळेकर स्वतः सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत सुमारे 100 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी केली.

Nagpur: नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसची मुंबईत बैठक

- प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि रंजीत कांबळे यांची बैठक

- नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजीत कांबळे यांची नियुक्ती

- मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय

- मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबतंही बैठकीत चर्चा

- 19 आणि 20 रोजी होणार नागपुरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

कल्याण पूर्वेत मेट्रो मॉल समोर भर रस्त्यात मद्यपी तरुणाचा धिंगाणा ,

कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉलसमोर भर रस्त्यात एका मद्यपी तरुणाने धिंगाणा घातल्याची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाने ये–जा करणाऱ्या वाहनांना अडवून चालकांना धमकावले, तसेच रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण अचानक रस्त्यावर उभा राहून गाड्यांसमोर झेपावत होता. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी त्याने जवळच्या दुकानांतील साहित्य फेकून दिले व काचफलकांची तोडफोड केल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कल्याण पूर्व परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी तसेच मद्यपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

उद्यापासून प्राथमिक चर्चा सुरू होईल... संपूर्ण महाराष्ट्रात २९ महापालिकेत जे काही २९ कमिटी आहेत. भारतीय जनताचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी हे मिळून चर्चा करून बैठक करतील.महायुतीमध्ये जे काही जागावाटप बद्दल जो काही निर्णय आहे. तो होईल. जिथे कुठे अडचण येईल तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि प्रदेश अध्यक्ष सोबत आमचे प्रमुख लोकांना घेऊन निर्णय घेऊ
एकनाथ शिंदे

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढणार का?

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढणार का.. यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. तर नगर महानगरपालिकेत महायुती म्हणून सामोरे गेलं पाहिजे अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. निवडणुका लागल्या आहे यावर आम्ही आता बसून चर्चा करू असा विखे यांनी म्हटलं आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढत होतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. मात्र अहिल्यानगर शहरांमध्ये महायुती म्हणूनच सामोरे जावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीभाडा परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली असून भाजपचे प्रभाग क्रमांक ४ क मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com