Manasvi Choudhary
तुम्ही साडीवर ब्लाऊजची स्टाईल ज्याप्रमाणे करता त्यावर तुमच्या साडीच्या लूकला मॉडर्न आणि स्टायलिश टच मिळतो.
सध्या साडीच्या ब्लाऊजचे नवनवीन ट्रेडिंग पॅटर्न आहेत जे तुम्हाला उठून दिसतील.
पफ स्लीव्हज किंवा 'फुग्याच्या बाह्या' हा ट्रेंड सध्या अनेक महिला करतात. खांद्यावर थोडे फुगीर आणि खाली काठ असलेला हा ब्लाऊज पॅटर्न आहे.
हाताच्या कोपरापर्यंत लांब असलेल्या ब्लाऊज तुम्ही कॉटन साडी असो वा भरजरी शालूवर परिधान करू शकता.
बाहीच्या काठावर किंवा मध्यभागी त्रिकोणी अश्या डिझाईनमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता.
इंडो-वेस्टर्न साड्या किंवा प्रिंटेड साड्यांवर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असल्यास तुम्ही फ्रिल स्लीव्हज ब्लाऊज शिवू शकता.
ब्लाउजच्या हातासाठी साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे नेट ब्लाऊज शिवू शकता.