Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर? अत्यंत महत्वाची २ कारणे आली समोर

Maharashtra Government: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता कमी दिसत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर जाण्यामागची दोन कारणं समोर आली आहेत.

Priya More

गणेश कवाडे, मुंबई

पावसाळ अधिवेशनाआधी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधी (Monsoon Session) महत्वपूर्ण घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतील असे देखील बोलले जात होते.

पण अशामध्येच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराची शक्यता कमी दिसत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर जाण्यामागची दोन महत्वाची कारण देखील समोर आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री मंडळाच्या विस्ताराची शक्यता कमी आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तूर्तास मंत्रिमंडळ विस्तार नाहीच अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विस्तारासाठी आग्रही आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास समसमान मंत्री पदाचे वाटप करण्याची शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मागणी होती.

अवघ्या १२ मंत्री पदाचे वाटप करताना प्रत्येकी ४ मंत्री पदे वाट्याला येणार होती. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तुलनेत भाजपमधील आमदारांची संख्या अडीच पट अधिक आहे. परिणामी जर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा सुरू होती. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. राज्यातील ४८ लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली होती. महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला फक्त १७ जागांवर विजय मिळवता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT