Maharashtra News Live Updates: अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक

Maharashtra Breaking News Today Live Updates : आज दिनांक २६ जून २०२४ वार बुधवार देश विदेश तसेच महाराष्ट्रातील सर्व वेगवान घडामोडींचे लाईव्ह अपडेट् वाचा फक्त एका क्लिकवर
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

Uddhav Thackeray group : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित होते.

Amol Mitkari : ट्रिपल इंजिनमध्ये राष्ट्रवादी पक्ष नाही का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ट्रिपल इंजिनमध्ये राष्ट्रवादी पक्ष नाही का? याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी द्याव. त्यांना मान्य नसेल, तर डब्बल इंजिनचा उल्लेख कसा केला, याचा खुलासा द्यावा, असे मिटकरी पुढे म्हणाले.

Mahad Rain Update : महाडच्या खाडी पट्ट्याचा संपर्क तुटला

महाडच्या खाडी पट्टयाचा संपर्क तुटला आहे. महाड म्हाप्रळ रस्त्यावर तेलंगे गावाजवळ रस्त्यावरून पाणी वाहत आहे. म्हाप्रळ पंढरपुर रस्त्याच्या कामाचा खाडी पट्टयातील रहिवाशांना फटका बसला आहे.

Salman Khan Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण : गँगस्टर गोल्डी ब्रार विरोधात रोख बक्षीस जाहीर

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणण्याचे आरोप असलेला गँगस्टर गोल्डी ब्रार विरोधात NIA ने केला रोख बक्षीस घोषित केलं आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारवर १० लाख रुपयांचं रोख बक्षीस घोषित केलं आहे.

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ५ वाजेपर्यंत 84.86% मतदान

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात ५ वाजेपर्यंत 84.86% मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान नंदुरबार जिल्ह्यात 90.25 टक्के मतदान झालं. तर नाशिक जिल्ह्यात 85.35%, नगर जिल्ह्यात 82.62%, जळगावला 83.61% आणि धुळ्याला 86.59% मतदानाची नोंद झाली.

Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

लोकसभा निवडणूककाळात काही विधानांवरून वादात सापडलेल्या सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. वादात सापडल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची जुलै महिन्यात पुण्यातील रेस कोर्स मैदानावर जाहीर सभा

मनोज जरांगे पाटील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. ज्या मैदानावर मोदींची सभा झाली त्याच रेस कोर्स मैदानावर ही सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे काल पुणे जिल्हा मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीत रेस कोर्स च्या मैदानावर सभा घेण्याचा एक मताने झाला ठराव झाला.

Maratha Bhavan : महाराष्ट्रातील पहिल्या मराठा भवनाला राज्य सरकारचा हिरवा कंदील

महाराष्ट्रातील पहिल्या मराठा भवनाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपुरात मराठा भवन उभारणीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्टेशन रोडवरील नगरपालिकेच्या जागेत हे भवन उभारण्यात येणार असून कार्तिक यात्रेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाच कोटी निधी मंजूर झाल्याची दिली माहिती दिली.

Pune Porsche Car Accident : सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता

सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या जामीन अर्जावर कोर्टाने अद्याप निर्णय दिलेला नाही. आज दोन्ही बाजूंनी कोर्टात युक्तीवाद झाला मात्र कोर्टाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वर-सातारारोडवर केळघर घाटात कोसळली दरड

महाबळेश्वर सातारारोड दरम्यान केळघर घाटात आज सायंकाळी साडेचार वाजता दरड कोसळली. धोकादायक वळणावर कोसळलेल्या दरडीमुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत देखील झाली होती. पावसाळ्यात सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

Raju Shetti : भर पावसात राजू शेट्टी यांचं भाषण; कर्जमुक्तीसाठी १ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन

शेतकरी नेते राजू शेट्टी येत्या एक जुलै पासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एक तारखेपासून राज्यभर आंदोलन करणार असून आंदोलनाला पुसद सुरुवात करण्यात येणार आहे. भर पावसात राजू शेट्टी यांचे भाषण केलं असून पावसात भिजतच शेतकऱ्यांनी त्यांचं भाषण ऐकलं.

Mumbai Rain : दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

गेले काही दिवस ओढ दिलेल्या मान्सूनने आज मुंबई परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत सायंकाळी मुसळधार वावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या अधून मधून सरी बरसत आहेत.

Pune Porsche Car Accident : सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल जामीन प्रकरणाची सुनावणी पूर्ण

सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल जामीन प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून थोड्या वेळात निर्णय देण्यात येणार आहे. चालकाचं अपहरण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला.

Maharashtra Lagislatitve Councial Election : नाशिक शिक्षक मतदासंघातील मतदान केंद्राबाहेर गैरप्रकार, ५०० च्या नोटांची सापडली पाकीटं

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू असून नाशिक शिक्षक मतदारसंघातील मदान केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मतदानकेंद्रानजीक ५०० च्या नोटांची पाकीटं सापडल्याने खळबळ माजली आहे.

CM Shinde Visit: घाटकोपर येथील असल्फा भागातील हनुमान टेकडी भागाचा मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा

घाटकोपर येथील असल्फा भागातील हनुमान टेकडी भागात आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौरा केला. हा पाहणी दरडग्रस्त भागातील होता. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे सतर्कतेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी दौरा केला.

 Nashik MLC Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानावेळी  गोंधळ 

शिक्षक मतदारसंघाच्या मतदानावेळी गोंधळ झालाय. मतदानावेळी पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्राच्या बाहेर पैशाचे पाकिटे वाटप करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी केलीय. बी डी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ झालाय. मतदान केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याच्या कारणावरून गोंधळ झाला. पैसे वाटणाऱ्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Congress Protest : छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन

छत्रपती संभाजी नगरमध्ये आज हज हाऊसमध्ये अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे उद्घाटन होणार आहे, मात्र यावेळी काँग्रेसच्या वतीने या उद्घाटनप्रसंगी विरोध करण्यात आला आणि यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पुढच्या काही वेळातच मंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये या हज हाऊसचे उद्घाटन करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी सध्य स्थितीला काँग्रेसचे कार्यकर्ते हज हाऊसच्या बाहेर बसून घोषणाबाजी करत आहे.

Varsha Gaikwad: वर्षा गायकवाड यांंना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवणार?

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. वर्षा गायकवाड यांंना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. आठवडाभरानंतर पक्षाचे काही ज्येष्ठ नेते वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Ratnagiri News : चिपळूणमध्ये जादूटोणा करणाऱ्या बाबाला अटक

चिपळूणमधील जागृत महिलांनी बाबाचा पर्दाफाश केलाय. एका आलिशान फ्लॅटमध्ये बाबा १० हजार रुपयांच्या भाडे भरत तेथे बाबाचा दरबार भरवत असायचा. बाबा एकावेळी फक्त एकाला भेटत असायचा. पोलिसांनी धाड टाकल्यावर बाबाच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी जादुटोणाचे सर्व साहित्य जप्त केलंय.

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना झालेल्या मारहाण  प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काही दिवसांपूर्वी मंदिरात नाशिकच्या भाविकांना मारहाण झाली होती. मंदिरातील सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी आणि तपास करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेंद्र सूर्यवंशी आणि कुटुंबाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाली होती. महेंद्र सूर्यवंशी आणि कुटुंबीय त्रंबकेश्वरच्या दर्शनाला त्यावेळी त्यांना मारहाण झाली होती.

Beed News : पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अनुसरून सोशल माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.

वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर "एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार" अशी रील पोस्ट केली होती. त्या रीलवर देवडी येथील धनंजय झाटे या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुत्व दुर्भावना वाढवून एकोपा टिकू नये, या उद्देशाने पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करत पोस्ट केली.

दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण शांत झाले असले तरी सोशल माध्यमांवरील सोशल वॉर अद्याप थांबलेला नाही.

मोठी बातमी! मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बदलणार? हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून वर्षा गायकवाड यांना हटवणार जाणार, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस नेत्यांचा शिष्टमंडळ भेटीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथेला यांना बोलावून प्रकरणात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.

वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याने दिल्ली हायकमांड निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Maharashtra Politics : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

राज्य विधीमंडळाचं पावसाची अधिवेशन उद्यापासून (ता. २७ जून) सुरू होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी (शरद पवार) अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) अंबादास दानवे, शेकाप जयंत पाटील, सपा अबू आझमी उपस्थित आहेत.

Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्री मंडळाच्या विस्ताराची शक्यता कमी आहे.

इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तूर्तास विस्तार नाहीच, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विस्तारासाठी आग्रही होते

मंत्री मंडळ विस्तार झाल्यास समसमान मंत्री पदाचे वाटप करण्याची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती.

अवघ्या १२ मंत्री पदाचे वाटप करताना प्रत्येकी ४ मंत्री पदे वाट्याला येणार होती.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत भाजपमधील आमदारांची संख्या अडीच पट अधिक आहे.

परिणामी विस्तार झालाच तर भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra News Live Updates : तुकोबारायांच्या पालखीला यंदा चेन्नईहून मागविली छत्री

श्री संत तुकाराम महाराजांच्या 339 व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतलेली आहे.

ही छत्री श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. या छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखीसोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे लक्षवेधी ठरणार आहे.

ही छत्री रंगीत व आगळी वेगळी सुरेख पद्धतीने तयार केलेली असून अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका यांच्या समवेत भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. या छत्रीचा वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे.

छत्रीसाठी लागणार्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. लोखंडी तारा बसविलेल्या नाहीत. छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीचे एसएस लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे. छत्रीच्या वर पितळी कळस बसविण्यात आला आहे.

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

दिल्ली मद्यधोरण कथित गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने त्यांना आज सकाळी तिहार जेलमधून राऊज एव्हेन्यू कोर्टात नेलं. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सीबीआयनं त्यांची कोठडी मागितली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयने कोर्टात ही माहिती दिली.

Lok Sabha Speaker Elections Live : मोठी बातमी! ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड

ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांना ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष बनले आहेत. संसदेत आज आवाजी मतदान पार पडले. यामध्ये ओम बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी समर्थन दर्शवलं.

Lok Sabha Speaker Elections Live : लोकसभा अध्यक्षपदासाठी PM मोदींनी मांडला ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव

लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात मतदान होणार आहे. तत्पुर्वी मोदी यांनी अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला आतापर्यंत १३ पक्षांनी समर्थन दिलं आहे. अजूनही बरेच पक्ष समर्थन देत आहेत.

Lok Sabha Speaker Elections : लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात मतदान, संसदेत खासदारांची लगबग

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहेत. थोड्याच वेळात खासदार लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात पोहचले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सभागृहात प्रवेश केला आहे.

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकाची 45 लाख रुपयांची फसवणूक, डॉलरच्या नावाखाली गंडा

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील एका शिक्षकाची 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डॉलरच्या नावाखाली अज्ञाताने शिक्षकाला हा गंडा घातलाय.

डॉलर भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळे टॅक्सचे नावाखाली रक्कम उकळल्याचं समोर आलं आहे. आरोपीने 29 फेब्रुवारी 2024 ते 16 जुन 2024 या काळात 45 लाख 90 हजार विविध बॅक खात्यामध्ये भरण्यास सांगितले.

याप्रकरणी सायबर पोलिसात कलम 420, सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Mumbai Rain News : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईसह उपनगरात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, दहिसर, कांदिवली मालाड, गोरेगाव ,विलेपार्ले, सांताक्रुझ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील अनेक दिवसापासून मुंबईत पावसाने मारली दांडी मारली होती. आज धुव्वाधार पाऊस बरसल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

Pandharpur News : मोठी बातमी! पंढरपुरात विठ्ठल पदस्पर्श दर्शन रांगेत मोठा गोंधळ

पंढरपुरात विठ्ठल पदस्पर्श दर्शन रांगेत मोठा गोंधळ झाल्याची माहिती आहे. दर्शन रांगेत भाविकांची गर्दी झाल्याने भाविकांनी एकमेकांना ढकलून दिलं आहे. त्यामुळे आषाढीपूवी दर्शनबारीची व्यवस्था कोलमडली आहे. दर्शन रांगेत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने घुसखोरीच्या प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच हा गोंधळ झाल्याचं कळतंय. यामुळे रांगे उभ्या राहिलेल्या इतर भाविकांचे हाल होत आहेत.

Pune News : पुण्यातील एरंडवा परिसरात आढळले झिका व्हायरचे दोन नवे रुग्ण

पुणे शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत.

एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे.

दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली.

त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.

पुण्यात यंदा प्रथमच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

Maharashtra Politics : विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढवणार, सूत्रांची माहिती

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या 'मविआ'मधील तिन्ही घटकपक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडी आगामी विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Kokan Election : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यात 44 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. जिल्ह्यात 28 हजार 925 इतके पदवीधर मतदार यामध्ये 12987 महिला मतदार तर पंधरा हजार 930 पुरुष मतदार आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात प्रत्यक्षात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी महायुतीच्या भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.

ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून केंद्रान संदर्भात माहिती घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Solapur News : प्रणिती शिंदे यांनी खासदारकीची शपथ घेताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले मनोज जरांगेंचे बॅनर्स

प्रणिती शिंदे यांनी खासदारकीची शपथ घेताच काँग्रेस कार्यकर्त्याने मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स लावले आहेत.

सोलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स लागले आहेत.

मनोज जरांगे पाटील हे मुस्लिम आरक्षणासाठी ही आवाज उठवणार असल्याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

बॅनरवरती सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील, राहुल गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांचेही फोटो आहेत.

शोएब महागामी या सामाजिक संस्थेकडून शहरभर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Lok Sabha Speaker Elections : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतेय लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

NDA कडून ओम बिर्ला हे तर INDIA आघाडीकडून के सुरेश आहेत लोकसभाध्यपदाचे उमेदवार आहेत. NDA कडे सध्या तरी बहुमत असल्याची चिन्हं आहे.

भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी यासह इतर सर्व महत्त्वाच्या पक्षांनी आपापल्या पक्षातील खासदारांना व्हीप जारी केला आहे.

आज होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा कस लागणार आहे

NDA कडून लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जबाबदारी ही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झालीय. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून एकूण ९० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. मतदान करण्यासाठी शिक्षकांना २ तासांची विशेष रजा देखील देण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिंदे सेनेचे किशोर दराडे, महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात चौरंगी लढत होतेय.

तर या निवडणुकीत शिक्षक मतदारांना मोठ्या प्रमाणात पैठणी, कपडे, नथ आणि पैशांचं वाटप झाल्याच्या तक्रारी करण्यात झाल्यानं ही निवडणूक चर्चेची बनलीय. दरम्यान यासंदर्भातील आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

Vidhan Parishad Election :राज्यातील विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी मतदान सुरू

मुंबईत आज शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई शिक्षक आमदार मतदार संघासाठी पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे यांनी बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली महापालिका शाळेमध्ये सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अनेक चांगली कामे केली आहेत. अंशतः अनुदानित शाळांना 60 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक कुटुंबीयांच्या चूली पेटू लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक हे शिवसेना पक्षासोबत असून आमचाच विजय होईल असा दावा उमेदवार शिवाजी शेंडगे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.