sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या (ShivSena) ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात आला, या संबंधित व्हिडिओ, आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे, ते आमदार आमच्याशीच आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

भाजपने (BJP) शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. शिवसेनेसोबत एकुण २३ आमदार असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला. फ्लोअर टेस्टवेळी कोण कोणासोबत आहे, हे समोर येईल असंही संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले.

गुवाहाटीमध्ये बंड करुन गेलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी गुवाहाटीमध्ये हॉटेलात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे, सकाळी या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Edited

यावेळी नितीन देशमुख यांनी सुरत मधील अनुभव सांगितला. हे सर्व कटकारस्थान भाजप असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. सुरतमध्ये त्या हॉटेलबाहेर ३५० ते ४०० गुजरात पोलिसांचा फौजफाटा होता असा आरोपही त्यांनी केला.

'महाविकास आघाडीतून बाहेर पडायचे असेलतर शिवसेनेने बाहेर पडायची इच्छा असेल तर २४ तासाच्या आत गुवाहाटीतील आमदारांनी परत यावे, तर त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT