Eknath Shinde Live Updates: एकनाथ शिंदे गटाचे नरहरी झिरवळ यांना पत्र; गटनेतेपदी शिंदे तर मुख्य प्रतोदपदी गोगावले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

एकनाथ शिंदे गटाचे नरहरी झिरवळ यांना पत्र; गटनेतेपदी शिंदे तर मुख्य प्रतोदपदी गोगावले

शिवसेना घटकपक्षाची बैठक पार पाडून सदर बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या ३७ आमदारांची स्वाक्षरी असून, या पत्राची प्रत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानपरिषदेचे सचिव यांना पाठवण्यात आले आहे.

शिवसेनेला आणखी एक झटका! एक मंत्री आणि चार आमदार गुवाहाटीत पोहचले

राज्यात शिवसेना (ShivSena) आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये आहेत. आज पुन्हा चार आमदार गुवाहाटीत गेले आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय राठोड, अपक्ष आमदार गीता जैन, किशोर जोडगेवार हे आता गुवाहाटील पोहोचले आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; दिल्या महत्वाच्या सूचना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्ष वाढवण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे गटाबाबत आणि सोडून गेलेल्या आमदारांविषयी बैठकीत कोणतीही चर्चा केली नाही. विभागावर लक्ष द्या आपण ताकदीने लढू, असं म्हणत ठाकरे यांनी शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. तसेच विभागवार मेळावे लावाल शाखा शाखा पिंजून काढा.

महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोना काळात चांगले काम केले. प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांना सांगतिली आहे, आणि अजूनही त्यातील आमदार शिवसेनेसोबत आहोत हे स्पष्ट करतील, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

भाजपचा मोठा नेता काही करतोय असं दिसून आलं नाही- अजित पवार

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा असा कुठला मोठा नेता आणि चेहरा काही करतोय हे अद्याप दिसून आलेले नाही, असे अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा गट आमदारांच्या सह्यांचं पत्र उद्या राज्यपालांना पाठवणार

- एकनाथ शिंदे गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती

- आमच्याकडे ४२ आमदारांचं संख्याबळ असल्याचं पत्र पाठवणार

- आणखी काही आमदार आज येणार असल्याने त्यांच्या सह्या घेऊन पत्र पाठवणार

रवींद्र फाटक गुवाहाटीला पोहोचल्याची माहिती

रवींद्र फाटक गुवाहाटीला पोहोचल्याची माहिती, याआधी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत सूरत येथे शिंदेच्या भेटीसाठी फाटक गेले होते.

घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊत यांची बंडखोरांना पुन्हा ट्विटद्वारे साद

'चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू, शरद पवारांसह प्रमुख नेते उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात

शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित

मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न- खरगे

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यामागे भाजपचा हात - मल्लिकार्जुन खरगे

भाजपकडून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, खरगेंचा आरोप

ज्या राज्यांत काँग्रेसचे सरकार आणि बहुमत होते, तिथे अल्पमतात आणण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले. हाच खेळ महाराष्ट्रात सुरू आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे भाजपचा महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचा आरोप

संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेली, राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देणार

- संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेली

- ४० हून अधिक शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत असल्याचा शिंदे यांचा दावा

- पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार

- राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर वाढवली पोलीस सुरक्षा

काँग्रेसची आज संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, प्रमुख नेते राहणार उपस्थित

सुटका करून पळून आलो हा आमदार नितीन देशमुखांचा दावा खोटा, शिंदे गटाने फोटो केले व्हायरल 

एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात आला, या संबंधित व्हिडिओ, आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे, ते आमदार आमच्याशीच आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

एकनाथ शिंदेंचे गुवाहाटीत ४२ आमदारांसह शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी गुवाहाटीमध्ये हॉटेलात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत, मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांची सोशल मीडियावरील पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित

वेळ पडली तर विरोधात बसू- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. त्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या बैठकीत सध्याचा घडामोडींवर चर्चा झाली. सरकार टिकावे यासाठी चर्चा झाली. गेलेले आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा आहे. सरकार टिकविण्यास आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. वर्षा बंगल्यावर राहण्यास ते पूर्वी तयार नव्हते. पण आमच्या आग्रहाने ते राहिले. त्यांनी 'वर्षा' सोडला म्हणजे मुख्यमंत्रिपद सोडलं असं नाही, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेतून आमदार बाहेर पडतील, असे कधी वाटत नव्हते. वेळ पडली तर विरोधात बसू, असं ते म्हणाले.

नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, सकल मराठा समाजाने लावले पोस्टर

-वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर

-सकल मराठा समाजाने लावला बॅनर

- शिवरायांचे तुम्ही खरे शिलेदार, शिंदेसाहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा आशयाचे बॅनर

- शिवसेनेची अलिबागमध्ये होणारी बैठक रद्द

ही आहे आमदारांची भावना...; एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे पत्र केलं ट्विट,पाहा!

मुख्यमंत्र्यांनी दिलेले शिवसेना विधीमंडळ गटनेता नियुक्तीचं पत्र वैध - नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा

नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कायद्यानुसार, पक्षप्रमुख गटनेत्याची निवड करतो. मुख्यमंत्री महोदयांनी चौधरींच्या निवडीचे पत्र दिले. अजय चौधरींच्या निवडीला मान्यता दिली. सुनील प्रभू पक्ष प्रतोद आहेत. माझ्याकडे अन्य कोणतेही पत्र आलेले नाही. दावा करणे हा त्यांचा प्रश्न आहे. कायद्यानुसार जे योग्य आहे ते करू, असे झिरवाळ यांनी सांगितले.

मुंबई, ठाण्यानंतर मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्या मराठवाड्यातील १२ विधानसभा आमदारांपैकी ८ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतच राहणार- जयंत पाटील

मुंबई: सिल्व्हर ओकवरील बैठक संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतच आहे, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

मुंबईतील आमदार तरी जाणार नाहीत असे वाटले होते. आम्हालाही आश्चर्य वाटत आहे, असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

मुंबई: मातोश्रीवर शिवसेनेचे आमदार आणि नेते जाण्यास सुरुवात, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

एकनाथ शिंदे गटाला राज्यात ८ मंत्रिपदे, केंद्रात दोन मंत्रिपदे? 

एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, ५ राज्यमंत्रिपदे देण्याची शक्यता, तर केंद्रात २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, सत्ता समिकरणाच्या हालचाली सुरू

सर्व मिलीभगत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट 

उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय?

उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय हे कळायला मार्ग नाही. सरकार अडचणीक असताना ते आज मंत्रालयातील सचिवांसोबत व्हीसीद्वीरे बैठक घेणार आहेत.

शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर गुहावाटीमधील 'रेडीसन ब्लु' हॉटेलमध्ये पोहोचले.

शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटी येथील रेडीसन ब्लु हॉटेलमध्ये पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ताकद आणखी वाढली आहे.

पळालेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे - संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना पळून गेलेले आमदार म्हणजे शिवसेना नव्हे असं म्हटलं आहे. त्यांना बंड करू द्या; आम्ही शिवसेनेसोबत आहोत असंही संजय राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com