Sharad Pawar on Ajit Pawar and NCP SAAM TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: 'गेलेल्यांची चिंता करु नका, संघटना स्वच्छ झाली...' अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार स्पष्टचं बोलले

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये पार पडला. या मेळाव्यातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. ज्याला शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे| ता. २ डिसेंबर २०२३

Sharad Pawar News:

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जमध्ये पार पडला. या मेळाव्यातून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.  अजित पवार यांच्या या आरोपावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले असून सोडून गेलेल्यांची चिंता करण्याचे कारण नाही, नवीन लोकांना संधी देऊ, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

"ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट केले, तुम्ही शक्ती दिली, तुमच्यामुळे ते शक्तिशाली झाले ते काही आपले सहकारी सोडून गेले. त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. संघटना स्वच्छ होत आहे.." असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी लगावला.

" ते लोकांमध्ये गेले तर त्यांना लोक प्रश्न विचारतील. त्यामुळे आपल्यावरच अन्याय कसा झाला आहे, हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते काय बोलतायत, काय टीका करतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही," असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

तसेच "तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडून आला? तुमचं चिन्ह काय होतं? विचार काय होता? हे लोक त्यांना विचारतील. त्याचं उत्तर त्यांना द्यावा लागेल. सत्ता येते सत्ता जाते, सत्ता गेल्यानंतर तुम्ही पुन्हा उभे राहिलात. तर त्याला जनतेचा पाठिंबा मिळतो," असा संदेशही शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. (Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राज्यभरातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात पार पडत आहे. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीनंतर शरद पवारांची पत्रकार परिषद होईल, ज्यामध्ये ते मोठे गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT