Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil
Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange PatilSaam Tv

Maratha Reservation : '...तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे', मराठा आरक्षणावरून मंत्री विखे पाटलांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Radhakrishna Vikhe Patil : ''मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्याकडे सरकारने जी वेळ मागवून घेतली आहे, तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे'', असा सल्ला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
Published on

सुशील थोरात, | ता. २ डिसेंबर २०२३

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil :

''मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्याकडे सरकारने जी वेळ मागवून घेतली आहे, तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे'', असा सल्ला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार काम करत आहे, या प्रश्नांवरून विनाकारण तेढ वाढत आहे. त्यामुळे सरकारला दिलेल्या वेळेपर्यंत त्यांनी थांबावं, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil
Sanjay Raut News: '२०२४ पर्यंत थांबा, आपोआप तुरुंगात जाणार..' मंत्री दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत कडाडले

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवण्याचे भाजपचे षडयंत्र होते, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ''संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, माध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये.'' (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील चिंतन शिबिरामध्ये बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील भाजपमध्ये यायचं असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil
Shiv Sena Mla Disqualification case: ई-मेल आयडीवरून खडाजंगी; ठाकरे गटाकडून पुराव्यांसह उत्तर सादर

यावर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत विषय असून अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या हिताची आहे. भाजपमध्ये येणे न येणे हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचाही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com